चिखली विधानसभा मतदारसंघात विरोधक हे सातत्याने मुस्लिम समाजाला भडकवण्याचे वा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येतं आहे.
भाजप सरकार आल्यास चुकीचं ठरेल,आ. श्वेताताई महाले निवडून आल्यास तुमच्यासोबत चुकीच्या बाबी होतील असे सातत्याने विशिष्ट समाजाच्या काही लोकांना सांगून त्यांना विकासाच्या मार्गावरून भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.पण आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या कामातून विरोधकांच्या सर्व प्रश्नांना न बोलताच उत्तर दिले आहे.
चिखली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार श्वेताताई महाले यांनी दलित व मुस्लिम समाजाची कधी नव्हे एवढी विकास कामे केली आहेत. मुस्लिम धर्मियांसाठी ठिकठिकाणी शादीखाने तर बौद्ध समाजासाठी बुद्ध विहार तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ देखील दलित व मुस्लिम समाजापर्यंत श्वेताताईंनी पोहोचवले. त्यामुळे हे दोन्ही समाज श्वेताताईंच्या पाठीशी मागे उभे राहतील असा विश्वास भाजपा जिल्हा सरचिटणीस देविदास जाधव यांनी व्यक्त केला.
आ. श्वेताताई पुन्हा निवडून आल्या तर तुमचा काही फायदा होणार नाही,असे चुकीचे मॅसेज वायरल केले जात आहे. त्यामुळे मला त्या लोकांना संदेश द्यायचा आहे की, जर रस्ते विकास होत असेल. शाळांचा विकास झाला, तर तिथे हिंदू मुलं आणि मुस्लिम मुलंही येतील. दोघांनाही एकाच प्रकारचं शिक्षण मिळेल, शाळा,रस्ते व आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा अधिक चांगल्या करण्यासाठी सतत धडपडणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांना अल्पसंख्य समाजातूनही प्रचंड मतदान होईल असा आम्हाला विश्वास असल्याचे देविदास जाधव म्हणाले.



