पायाखालची वाळू निसटत असल्यामुळे राहुल बोन्द्रे यांचे पुनः विद्याधर महाले यांचे नावाने शिमगा सुरु….. शिवराज पाटील
आज सकाळी माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी सर्व पत्रकारांसमोर निवडणूक याद्यामध्ये घोळ होत असल्याबद्दल व त्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संबंध असू शकतात याबद्दल संशय व्यक्त केला,त्या अनुषंगाने आमदार सौ श्वेताताई महाले यांचे बंधू शिवराज पाटील यांनी राहुल बोन्द्रे यांच्या समजेविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.माध्यमांशी बोलताना ते म्हणाले..
“काहीतरी खोट्या गोष्टी उकरून काढायच्या, त्या उगीच मोठ्या करून सांगायच्या! त्यानंतर दिवसभर आमदार ताई व श्री विद्याधर महाले यांच्या नावाने शिमगा करत रहायचा!हा राहुल बोंद्रे यांचा उद्योग झाला असून, जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज आता भरावेच लागणार आहे नाहीतर जेलची हवा खावी लागेल, हे माहिती असल्यामुळेच हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या श्री विद्याधर महाले साहेबांवर आगपाखड करत बसण्याचा दिनक्रम माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी सुरु केला आहे.”
मतदार यादीमध्ये नवीन नावांचा समावेश होणे व मतदार यादीतून मृत झालेल्या व्यक्तींची नावे काढून टाकणे या सर्व बाबी स्वायत्त असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकारात असतात.आणि खुद्द भारताचे पंतप्रधान देखील स्वायत्त निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाही.हे सर्व माहिती असतानाही उच्चशिक्षित असलेले राहुल बोंद्रे प्रत्येक गोष्टीचा संबंध ओढूनताढून राज्याचे गृहमंत्रालय व मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे स्वीय सहाय्यक असलेले श्री विद्याधर महाले साहेब यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात.
दहा वर्ष आमदारकी उपभोगलेल्या माजी आमदारालाा एवढीही समज नसेल तर या माणसाने आपल्या आमदारकीच्या कालावधीत काय केले असेल? त्याचा सुज्ञ जनतेने विचार करावा.
पांधण रस्त्यात भ्रष्टाचार झाला!असे ओरडून ओरडून सांगणाऱ्या राहुल बोंद्रे यांना जिल्हाधिकारी कार्यालयानेच खुद्द अद्याप पांधन रस्त्यात एकही रु. खर्च झाला नसल्याचे सांगितले,तरी यांचे ओरडणे सुरूच!
सावरगाव ला दीड दिवसाच्या अन्न त्याग आंदोलनाला बसले आणि मुकुल वासनिक च्या वाढदिवसाला लगेच संध्याकाळी दिल्लीला निघून गेले,असे यांचे शेतकरी प्रेम!
जिल्हा सहकारी बँकेचे आपल्यावर कर्ज नाहीत हे ओरडून ओरडून आपल्या आमसभेत सांगणाऱ्या राहुल बोन्द्रे यांच्याकडे 99 कोटी रु. शेतकऱ्यांचे कर्ज असल्याचे खुद्द बँकेनेच सांगितले.
अशाप्रकारे प्रत्येक वेळी तोंडावर आपटण्याची सवय पडल्यामुळे,राहुल बोंद्रे तोंडात येईल ती काहीही बरळत असतात.मर्यादेत राहून काहीही आरोप केले तर चालतील परंतु त्यांनी मर्यादाभंग करण्याचा प्रयत्न केल्यास,त्यांना जशास तसे उत्तर देण्याची धमक प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यामध्येे आहे.हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असेही शिवराज पाटील म्हणाले.



