-1.1 C
New York
Saturday, February 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

“लेक शब्दाला जागली”.!……! आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यामुळेे अखेर ” भक्ती महामार्ग रद्द”

“लेक शब्दाला जागली”.!………!

आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यामुळेे अखेर ” भक्ती महामार्ग रद्द”

सिंदखेड राजा ते शेगाव हा 110 की. मी. चा प्रस्तावीत ‘भक्ती महामार्ग’ अखेर शासनाने रद्द केल्याची अधिसूचना शासनाकडून प्रसारीत करण्यात आली.सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तिमार्ग शासनाकडून प्रस्तावीत करण्यात आला होता, सदर महामार्ग जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातून प्रस्तावीत करण्यात आला होता.या भक्ती महामार्गाबद्दल शेतकऱ्यांच्या उपजावू जमिनी त्यात जाणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता, शेतकऱ्यांचे एक शिष्ट मंडळ आमदार सौ श्वेताताई महालेे यांना येऊन भेटल्यानंतर, भक्ती महामार्गामुळे होणारे नुकसान व त्यासंबंधित शेतकरी बांधवांच्या नाराजी असल्याने हा प्रस्तावीत महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी मा. मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली होती.

माननीय मुख्यमंत्री यांना आमदार श्वेता ताई महाले यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ” भक्ती महामार्गाला सदर प्रस्तावातील 43 गावांमधील शेतकऱ्यांकडून विरोध असून, शेतकऱ्यांचा विरोध व शेतकऱ्यांमधील असंतोष पाहता या 43 गावांमधील जमिनी भक्ती महामार्गासाठी संपादित करण्यात येऊ नये व अधिग्रहित झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या” असे सुचित केले होते.

त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार श्वेता महाले यांनी आग्रहाणे भक्ती महामार्ग रद्द करण्यासंबंधीची आपली भूमिका विशद केली होती.विधानसभेच्या पटलावर शेतकऱ्यांची बाजू मांडताना त्यांनी खंबीरपणे भक्ती महामार्ग रद्द करण्यात यावा अशी आग्रही भूमिका घेतली होती.

त्यांनी सर्व शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे विधानसभेत मांडल्यानंतर सरकारकडून चर्चेसाठी सौ श्वेता महाले यांना बोलवण्यात आले होते.सौ महाले यांच्याशी संबंधित विषयावर संपूर्ण चर्चा झाल्यानंतर सरकारने अधिग्रहनाचा आपला निर्णय थांबवला असून भक्ती महामार्ग रद्द करण्यासंबंधीचा जी. आर. प्रसारीत केला आहे.सौ श्वेता ताई महाले यांनी शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत खंबीरपणे लावून धरल्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या