3.6 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

spot_img
spot_img

राहुल बोन्द्रे यांची मानसिकता गरिबविरोधी… तुम्ही कितीही विरोध करा आम्ही संसार बाटली संच गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारच….सुनील पोफळे

राहुल बोन्द्रे यांची मानसिकता गरिबविरोधी… 

तुम्ही कितीही विरोध करा आम्ही संसार बाटली संच गरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारच….सुनील पोफळे

महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त बांधकाम कामगार किट व संसार बाटली संच वाटप चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये झाले असून यासाठी आमदार श्वेता महाले यांनी प्रत्येक स्तरावर अतिशय प्रामाणिक प्रयत्न केल्याचे सगळ्या मतदारासंघात माहिती आहे.पण दसऱ्याच्या दिवशी काही गोरगरीब माऊल्याना आपल्या राजकीय स्वार्थासाठी उपाशी ठेवून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार श्वेताताई महाले यांना बदनाम करण्याचा जो बालिश प्रयत्न माजी आमदार करत आहेत, ही राजकारणात नवीन विकृती पाहायला मिळत आहे.जेव्हा जवळजवळ 90 ते 95% बांधकाम कामगारांना संसार बाटली संच वाटप झालेले असून, सर्वांना हे संच त्यांच्याच गावात प्राप्त व्हावेत म्हणून आमदार श्वेता महाले यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल गावागावातून ताईंचे कौतुक होत आहे, आणि त्याबद्दल प्रत्येक गावातून आमदार सौ. श्वेताताई महाले यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे परंतु आ. श्वेताताई ही कामे आपली कर्तव्य असल्याचेच सांगतात.

संसार बाटली कीट वाटपाचे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी दिला असून यातून त्यांची कामगार विरोधी मानसिकता दिसून येते.गरीब बांधकाम कामगारांना हे संच मिळू नये यासाठी राहुल बोंद्रे सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होते आता त्यांचे हे मनसुबे सार्वजनिक झाले आहेत.गरिबांना त्यांच्या हक्काची संसार बाटली कीट त्यांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचूनच देणार आहोत, आणि हे पुण्य काम करताना जर तुमचा विरोध असेल तर तो विरोध मोडून काढण्याची क्षमता आमच्या कार्यकर्त्यात आहे.असे भाजपा तालुकाप्रमुख सुनील पोफळे म्हणाले.

हजारो लोकांना शासनाकडून होईल ती सर्व शक्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या आमदार श्वेताताई यांना विकासाच्या व जनतेच्या प्रेमाला पात्र ठरण्याच्या मुद्द्यावर विरोध करण्याची कुवत नसल्याने, एकाच महिन्यात राहुल बोंद्रे यांना चार चार पाच पाच आंदोलने करावी लागत आहेत.सर्व आंदोलने त्यांच्या स्वतःच्या अंगावर उलटल्याने व जिल्ह्यातील जनता त्यांना जिल्हा बँक कर्जाच्या प्रकरणात तोंडावर उत्तर मागत असल्याने सैरभैर झालेले राहुल बोन्द्रे एका सुसंस्कृत राजकीय व्यक्तीला न शोभणारे बेताल वक्तव्ये करताना दिसत आहेत.असा टोमणाही भाजपा चिखली तालुकाप्रमुख सुनील पोफळे यांनी ठेवून दिला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या