रक्तदान हे एक महान कार्य आहे ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, रक्तदानाचे महत्त्व अपरिमित आहे.रक्तदानामुळे अपघातातील रुग्णांना किंवा शस्त्रक्रिया दरम्यान रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वाचवीने शक्य होऊन जाते.रक्तदानामुळे रक्ताचा पुरवठा सुरक्षित होऊन रुग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा होतो व अनेक संसार पोरके होण्यापासून वाचतात.
अशा रक्तदानाचा अगाथ महिमा जाणून “शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ,शेलसूर” येथील युवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत गणेश मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजित केले व जवळजवळ पन्नास युवकांनी स्वयंस्पुर्तीने रक्तदान करून प्रत्येकच गणेश मंडळात फक्त पत्ते कुटल्या जात नाहीत,प्रत्येक गणेश मंडळ फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करत नाहीत,तर काही जन सामाजिक बांधिलकी जपून समाजाला अधिक सुंदर व अधिक सुरक्षित करण्यासाठी झटत असतात हेही दाखवून दिले.
शिवप्रतिष्ठान गणेश मंडळ यांनी फक्त रक्तदान केले असे नसून, या युवकांनी रक्तपेढी द्वारे मिळालेली प्रमाणपत्रे गावात “एकाच” ठिकाणी ठेवून आवश्यक ज्याला रक्त लागेल, त्यांनी ही प्रमाणपत्रे घेऊन जावून रक्तपूरवठा करून घ्यावा असे आवाहनही केले आहे.धर्म आणि जातपात निरपेक्ष अशी कृती करून “शिवप्रतिष्ठान गणेश मंडळांने” समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.




