कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य व चितावणीखोर भाषण दिल्याने ,त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी बुलढाणा जिल्ह्यातील महिला काँग्रेस करीत आहे .अल्पसंख्याक समाजाबद्दल बेताल वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होऊन त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात. म्हणून आमदार नितेश राणे वर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले,हा देश सर्वांचा असून या देशांमध्ये सर्व जातीय लोक, सर्व धर्मीय लोक एकत्रित गुण्यागोविंदाने राहतात.आमदारासारख्या संविधानिक पदावर बसलेल्या जबाबदार लोकप्रतिनिधीने असे बेताल वक्तव्य करणे अशोभनीय व बेकायदेशीर आहे.त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रा. मिनल आंबेकर यांनी केली.
यावेळी प्रा.मीनल आंबेकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ,प्रमिला गवई उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेस, आशा इंगळे अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, रंजना चव्हाण बुलढाणा तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष ,लता चव्हाण ,वर्षा गवई ,जोत्सना जाधव, बानुबी चौधरी,सारिका राऊत ,मोनिका नवघरे, माया मिसाळ ,सविता शिंदे आदी महिलांची उपस्थिती होती.



