3.8 C
New York
Saturday, February 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

मातृतीर्थात आयात उमेदवार नकोच …..

“आयात उमेदवार नकोच”…..

महाविकास आघाडीच्या प्रमुख शिलेदारांची एकमुखाने मागणी.

आज सिंदखेड राजा येथे महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील प्रमुख शिलेदारांनी एकत्र येऊन एकमताने स्थानिक उमेदवार कुणाही पक्षाचा असला तरी चालेल,आम्ही सर्व प्रामाणिकपणे त्याचे काम करू पण, महाविकास आघाडीला निवडून येण्यासाठी अतिशय सकारात्मक वातावरण असताना या ठिकाणी आयात उमेदवाराला उमेदवारी देऊ नये अशी मागणी एकमुखाने केली.

सिंदखेडराजा मतदार संघामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात एक नकारात्मक जनमत तयार झाले असून, या लाटेचा फायदा करून घेण्यासाठी आयात उमेदवार प्रयत्नरत असल्याचे ऐकण्यात आहे, अशावेळी पक्षासाठी वर्षोनवर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या स्थानिक कष्टाळू उमेदवार व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतो.आयत्या बिळावर नागोबा असलेला उमेदवार नको,तर पक्ष व पक्ष संघटना बांधणीसाठी ज्या स्थानिक लोकांनी मेहनत घेतली आहे,त्यापैकी निवडून येण्याची शक्यता असलेल्या कुणाही उमेदवाराला संधी द्यावी,स्थानिक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही एकत्रीत प्रामाणिक प्रयत्न करू असा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षापैकी कोणत्याही घटक पक्षाला तिकीट मिळाले तर सर्व पक्षाचे स्थानिक पदाधिकारी त्यांचे प्रामाणिकपणे काम करतील फक्त उमेदवार हा स्थानिक सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातीलच असावा.अशी सर्वसामान्य मागणी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

Related Articles

ताज्या बातम्या