0.6 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

‘राहुल बोन्द्रे’ यांच्यासह थकीत कर्जदारांविरुद्ध जाहीर नोटीस…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्जवसुली प्रक्रिया सुरू….

‘राहुल बोन्द्रे’ यांच्यासह थकीत कर्जदारांविरुद्ध जाहीर नोटीस…

बुलढाणा : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., बुलढाणा यांनी थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी अधिनियम 2002 अंतर्गत कारवाई सुरू करत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली आहे.

या नोटिसीनुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह काही कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्यांच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तांवर बँकेने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

नोटिसीत नमूद केल्यानुसार, संबंधित कर्ज खात्यांवर सुमारे 66 कोटी 52 लाख 40 हजार 772 रुपये इतकी थकीत रक्कम असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्जफेड न झाल्यामुळे बँकेने राहुल बोन्द्रे यांच्यासह संबंधित कर्जदारांच्या नावासह गहाण ठेवलेल्या मालमत्तांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे.

या जाहीर नोटिसीत श्री. राहुल सिद्धिविनायक बोंद्रे, श्री. जितेंद्र सिद्धिविनायक बोंद्रे, श्री. अरुण नारायण नन्हई, श्री.मिलिंद श्रावण भंडारे यांच्या नावांचा समावेश असून त्यांच्या मालकीच्या विविध शेतजमिनी, प्लॉट आणि इतर मालमत्ता गहाण ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बँकेने नोटिसीद्वारे संबंधित मालमत्तांबाबत कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री, हस्तांतरण किंवा व्यवहार करण्यापूर्वी संबंधितांनी बँकेशी संपर्क साधावा, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

ही नोटीस दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली असून कर्जदारांनी थकीत रक्कम तातडीने जमा करून वसुलीची कारवाई टाळावी, असे आवाहन बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केले आहे…

Related Articles

ताज्या बातम्या