धाड येथे ज्ञानसाधनेला नवे बळ…
आ.श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकारातून १ कोटींच्या अत्याधुनिक अभ्यासिकेचे भूमिपूजन..
चिखली विधानसभा मतदारसंघातील ‘धाड’ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उभारण्यात येणाऱ्या १ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक अभ्यासिकेचे भूमिपूजन आज आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
या अभ्यासिकेमुळे ग्रामीण व अर्धशहरी भागातील विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज व दर्जेदार अभ्यासासाठी हक्काची जागा मिळणार असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमामागे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार तथा ‘विकासकन्या’ सौ. श्वेता महाले पाटील यांची दूरदृष्टी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरातील विद्यार्थ्यांसारख्या सुविधा मिळाव्यात यासाठीची तळमळ दिसून येते.
धाड येथे फक्त अभ्यासिका उभी राहत असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची मजबूत पायाभरणी होत आहे.असे उदगार याप्रसंगी आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनी काढले.
गेल्याच वर्षात चिखली शहरातदेखील अशाच दोन अत्याधुनिक अभ्यासिका उभारून आमदार श्वेता महाले पाटील यांनी हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणादायी दिशा दिली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठ्या शहरांमधील सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध होत आहेत, ही मोठी सामाजिक क्रांती मानली जात आहे.
अभ्यासिका ही केवळ इमारत नसून ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची शिडी असते, हा विचार आमदार श्वेता महाले पाटील यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसतो. शांत अभ्यासाचे वातावरण, इंटरनेट सुविधा, अद्ययावत ग्रंथालय, वाचनासाठी योग्य प्रकाशव्यवस्था आणि सुरक्षिततेची हमी अशा सर्व बाबी या अभ्यासिकेत उपलब्ध करून देण्याचा त्यांचा ठाम दृष्टिकोन आहे.
धाड येथे उभारली जाणारी अभ्यासिका देखील याच दर्जाच्या सुविधा घेऊन साकार होणार असून परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ती ज्ञानाचे केंद्र बनेल. शिक्षणासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना मोठ्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल.असे उदगार सौ. श्वेता महाले पाटील यांनी काढले.
“शिक्षणातून सक्षम पिढी, सक्षम पिढीतून सशक्त राष्ट्र” हा त्यांचा विचार या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरतो आहे.
धाड येथील १ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक अभ्यासिकेच्या भूमिपूजनावेळी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी या परिसरातील उज्वल शैक्षणिक परंपरेचा विशेष उल्लेख केला. सावळी (धाड) येथील विशाल नरवाडे हे आयएएस अधिकारी होऊन सध्या सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. प्रमोद येंडोले हेही याच धाड परिसरातील आहेत. ही नावे या भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले…
या भूमिपूजन सोहळ्यास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच आमदार श्वेता महाले पाटील यांच्या या शैक्षणिक विकासदृष्टीचे कौतुक केले. “शिक्षणातून सक्षम पिढी, सक्षम पिढीतून सशक्त राष्ट्र” हा त्यांचा विचार या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरतो आहे.



