1.5 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

नगराध्यक्ष पंडितराव यांच्या समोरील आव्हाने… पार्ट 1

नगराध्यक्ष पंडितराव यांच्या समोरील आव्हाने… पार्ट 1

कामचुकार व गैरहजर कर्मचाऱ्यांना शिस्त लावा व प्रसंगी दंडित करा..

चिखली शहराने दीर्घ कालावधीनंतर प्रशासकाच्या तावडीतून मोकळा श्वास घेतला. प्रशासकाला स्वतःची चूक कधी दिसत नसते,त्यामुळे प्रशासनात असलेल्या अनेक बाबी स्वतःच्या व स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी प्रशासन लपवीत असते.

आता चिखली नगर परिषदेला लोकनिर्वाचित नगराध्यक्ष मिळालेला आहे. तसेही पंडित दादा देशमुख यांची प्रतिमा अतिशय साधा पण शिस्तबद्ध माणूस अशीच आहे, आता स्वच्छ प्रतिमेला साजेस स्वच्छ काम करणे हे पंडित दादा समोरील ‘पहिले आव्हान’ असणार आहे.

नगर परिषदेमधील प्रत्येक विभागामध्ये कार्यरत कामचुकार कर्मचाऱ्यांची हजेरी व बायोमेट्रिक तपासणी आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यावर कुणाचाही नसलेला अंकुश, त्यामुळे आपले कुणी काही बिघडवू शकत नाही हा नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा झालेला गैरसमज दूर करणे व प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणे या बाबी प्रामुख्याने पंडित दादांना कराव्या लागणार आहेत.

काल आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये अतिशय समर्पक, सूचक आणि खंबीर उत्तरे देणाऱ्या नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांच्याजवळ आमदार श्वेता महाले पाटील यांच्या रूपाने ‘साक्षात विकास निधी’ असल्याने त्यांच्या वागण्या बोलण्यात अतिशय तयार असलेल्या नगराध्यक्षाची प्रतिमा पाहायला मिळाली. नगराध्यक्ष म्हणून पंडित दादा नगर परिषदेमधील कामचुकार व सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आढावा घेऊन त्यांना शिस्त लावतील ही ‘पहिली अपेक्षा’ व पंडित दादांना शुभेच्छा…!

 

Related Articles

ताज्या बातम्या