2 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

तारीख पे तारीख! मुद्दाम त्रुटी ठेवून अधिकाऱ्यांनी कोर्टात केल्या 150 पेक्षा जास्त तारखा….?

तारीख पे तारीख! मुद्दाम त्रुटी ठेवून अधिकाऱ्यांनी कोर्टात केल्या 150 पेक्षा जास्त तारखा….?

जिल्हा केंद्रीय बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच राजकारण्यांचा बँकेवर दरोडा?

कार्यकारी संस्था आपल्या कर्तव्य मध्ये कुचराई करत असेल किंवा आपल्या कर्तव्यप्रती बेईमान असेल तर किती नुकसान होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून जिल्हा केंद्रीय बँक व या बँकेचे अधिकारी असलेले अशोक खरात यांचे नाव घेता येईल.

जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या राजकारण्यांच्या कपटकारस्थानी सहकारामुळे कर्जाच्या खाईत व अडचणीत आलेली असताना जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांकडून कर्जाच्या वसुली करता कधीच पुरेसे व प्रामाणिक प्रयत्न झालेले दिसून आलेले नाहीत.

मुंगसाजी महाराज सूतगिरणी तसेच अनुराधा शुगर मिल्सकडे आज रोजी 100 कोटी रुपये थकीत आहेत. ही कर्जवसुली सन 2002 पासून प्रलंबित आहे. कर्ज वसुली होऊ नये याकरिता मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी न्यायालयात गेलेली आहे. 23 सप्टेंबर 2002 रोजी दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणाला 23 वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. आणि या प्रकरणात 150 पेक्षा जास्त तारखा आजपर्यंत झालेल्या आहेत. अशा वेळेस कोर्टाकडून तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख घेण्यासाठी आणि सहकारातील गुंडांना मदत करण्यासाठी अशोक खरात यांची मदत तर होत नाहीये? असा प्रश्न पडावा एवढे या प्रकरणात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गरिबांना कळणारही नाही एवढ्या सफाईदारपणे त्यांच्याच खिशावर डल्ला मारून राजकारणात गब्बर होण्याचा हा सुपरमार्ग अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय राजकारणी करू शकत नाही हे सत्य जनतेत जागृती घडवेल तेव्हा अशा अधिकाऱ्यांना जनता चोपून काढेल हे नाकारता येत नाही..

Related Articles

ताज्या बातम्या