राहुल बोंद्रे आणि अशोक खरात यांचे साटे लोटे?
मुंगसाजी महाराज सूतगिरणी संदर्भात ठोस कारवाईची जनतेची मागणी
राहुल बोंद्रे यांची मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणी या सुतगिरणीवर सक्तीची कार्यवाही करण्याकरता जे पथक आले होते. त्या पथकाला राहुल बोंद्रे यांनी एक कोटी रुपये व 11 कोटीचा धनादेश दिल्याने जप्ती तात्पुरती टळली होती. पण पुढे काय झाले?
मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीला दिलेली सबसिडी व जिल्हा सहकारी बँकेकडून दिलेले कर्जाचे पैसे हे गोरगरीब शेतकरी जनतेच्या खिशातील पैसे होते. जर कर्जाचे पैसे वसूल होत नसतील तर नियमानुसार वसुलीसाठी तारण मालमत्ता विक्रीला काढण्याचा अधिकार ज्या बँकेकडून कर्ज घेतली त्या बँकेला असतो.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक खरात बऱ्याच वर्षापासून या बँकेच्या शीर्षस्थानी ठाण मांडून बसलेले आहेत. परंतु अशोक खरात यांच्या कार्यकाळात जिल्हा केंद्रीय सहकारी बँक वाचवण्यासाठी काही कार्यवाही केलेली दिसत नाही.
अशोक खरात हे राहुल बोंद्रे यांच्यासारख्या राजकीय नेत्यांना वाचवत आहेत का? या राजकीय नेत्यांच्या तारण मालमत्ता लिलाव करून जिल्हा सहकारी बँकेचे हित करण्यासाठी अशोक खरात यांना कोण आडकाठी घालते? की अशोक खरात यांचा सुवर्णकाळ या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने गेला त्यामुळे उपकाराची परतफेड तर सुरू नाही ना? असे अनेक प्रश्न अशोक खरात यांच्या कामाविषयी जनतेत निर्माण होत आहे.
काहीजण कोणत्याही राजकीय नेत्यावर आणि विशेषतः राहुल बोंद्रे यांच्यावर अशोक खरात यांच्याकडून कार्यवाही होणार नाही, याबाबत एवढ्या खात्रीने सांगत आहे आणि यामध्ये करोडो रुपयाचे अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचेही सरळ बोलत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? हेही अशोक खरात यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे..
या संदर्भात बुलढाणा दर्पण टीम अशोक खरात यांच्याशी संवाद साधणार आहे…



