11.5 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘मी कधी जन्मलो?’ हा प्रश्न आता कोर्टात जाणार…?

जन्मतारखांचा जादुई खेळ : एका सरपंचाचे तीन जन्म?सत्य काय?

‘मी कधी जन्मलो?’ हा प्रश्न आता कोर्टात जाणार…?

चिखली विधानसभा मतदारसंघातील उदयनगर ग्रामपंचायतीचे अपात्र ठरलेले सरपंच मनोज लाहुडकर सध्या जन्मतारखांच्या त्रिवेणी संगमामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. एका व्यक्तीच्या आयुष्यात एकच जन्मतारीख असते, हा सामान्य समज उदयनगरच्या राजकारणात मात्र पुरता कोलमडलेला दिसून येतो.

मनोज लाहुडकर यांच्या जुन्या व मूळ आधार कार्डावर जन्मवर्ष 1989, दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला सांगतो सप्टेंबर 1990, तर नवीन आधार कार्ड आणि ग्रामपंचायत सरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर थेट 27 जून 1995 ही जन्मतारीख शपथेवर नमूद करण्यात आली आहे. म्हणजे एका व्यक्तीचे तीन अवतार, तीन जन्मतारखा आणि तीन वेगवेगळे वर्ष!

या कागदोपत्री करामतीत आणखी एक गूढ प्रश्न उभा राहतो. मनोज लाहुडकर यांनी आपली इयत्ता बारावी 2008 साली उत्तीर्ण केल्याचे नमूद आहे. जर प्रतिज्ञापत्रातील जन्मवर्ष 1995 खरे धरले, तर अवघ्या तेरा वर्षांच्या वयात बारावी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा अद्भुत पराक्रम त्यांनी साधला का? शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारा हा नवा विक्रम असल्यास, तो संशोधनाचा विषय ठरावा अशीच परिस्थिती आहे.

मग प्रश्न उपस्थित होतो—तीन ठिकाणी तीन जन्मतारखा नोंदवण्याचे काम मनोज लाहुडकर यांना का आणि कोणत्या उद्देशाने पडले?निवडणूक अर्जासोबत शपथेवर दिलेली जन्मतारीख जर 1995 असेल, तर शिक्षणाचा हा गणिती चमत्कार कसा शक्य झाला?

हा वाद सोडवणे आता सामान्य माणसाच्या कुवतीबाहेर असल्याने, या वादावर कोर्टामध्येच तोडगा निघू शकेल त्यामुळे काही जण या प्रतिज्ञापत्रावर शपथेवर सांगितलेली जन्मतारीख खरी की खोटी? यासाठी कोर्टात जाण्याची तयारीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या