3.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

नगराध्यक्ष चे पदाचे तिकीट आपल्या पक्षांतर्गत स्पर्धकाला मिळाल्यानंतर त्याचे औक्षण करून शुभेच्छा..

संस्कार, संघटन आणि सौहार्द यांची चिखलीतील जिवंत परंपरा….

नगराध्यक्ष चे पदाचे तिकीट आपल्या पक्षांतर्गत स्पर्धकाला मिळाल्यानंतर त्याचे औक्षण करून शुभेच्छा….

चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक परंपरेत आज एक हृदयस्पर्शी क्षण अनुभवायला मिळाला.आ. सौ. श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली नगरपालिका अध्यक्षपदासाठी डॉ. सौ. संध्या कोठारी व पंडित दादा देशमुख हे दोघेही उत्सुक होते. दोन्ही परिवारांचा अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेला निगडीत वारसा आणि सामाजिक–राजकीय कर्तृत्व अतिशय भक्कम आहे….

पक्षांतर्गत शिस्त, सौहार्द आणि सेवाभाव जपत दोन्ही उमेदवारांनी गृहभेटी, नेतृत्व भेटी घेत आपापली मैत्रीपूर्ण स्पर्धा केली. परंतु तिकीट एका व्यक्तीलाच देणे शक्यअसल्याने अंतिम निर्णयासाठी सर्वांचे लक्ष आ. सौ. श्वेताताई महाले यांच्याकडे होते.

आज त्या ऐतिहासिक क्षणी आमदार श्वेता ताई महाले यांनी आपल्या निवासस्थानी पंडित दादा देशमुख यांची भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून घोषणा केली.

या वेळी दोन्ही स्पर्धक पंडित दादा देशमुख आणि डॉ. संध्या कोठारी हे दोघेही उपस्थित होते.

घटनाक्रमाला भावनिक स्पर्श तेव्हा आला, जेव्हा डॉ.संध्या कोठारी यांनी स्वतःचे स्पर्धक असलेल्या पंडित दादा देशमुख यांचे औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

हीच संघ संस्कृती, हीच भारतीय जनता पक्षाची मूळ मूल्यव्यवस्था…

या सौहार्दपूर्ण आणि भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात,आ.सौ.श्वेता महाले पाटील यांनीदेखील डॉ. संध्या कोठारी यांचे औक्षण करून त्यांना सन्मान दिला.पाच वर्ष वाट पाहिलेल्या संधीची पूर्तता न होऊनही पक्ष, संघटना, संस्कार आणि सेवा या मूल्यांना जपत सहकाऱ्याला शुभेच्छा देण्याचा आदर्श डॉ. कोठारी यांनी घालून दिला.

संघ परिवारातील ही संस्कारसंपन्न परंपरा..पदापेक्षा सेवा मोठी, स्पर्धेपेक्षा संघटन मोठं, आणि वैयक्तिक इच्छेपेक्षा पक्षाची धारणा श्रेष्ठ या भावनेला आज नव्या तेजाने उजाळा मिळाला….

Related Articles

ताज्या बातम्या