डॉ. संध्या कोठारी यांच्या वैद्यकीय सेवेला “जनता” सलाम…
चिखलीत महिलांकडून उत्स्फूर्त पाठिंबा…
चिखली शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. संध्या विजयकुमार कोठारी यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक उबदार व भावनिक होत चालला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तब्बल चाळीस वर्षांच्या सेवेमुळे चिखली शहरातील असंख्य गोरगरीब, मध्यमवर्गीय तसेच सर्व समाजघटकांतील महिलांशी जुळलेली त्यांची ममता व विश्वासाची नाळ प्रचारात स्पष्टपणे जाणवत आहे.
गृहभेटीदरम्यान महिलांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया अतिशय हृदयस्पर्शी आहेत. अनेक जणी त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून आशीर्वाद देत आहेत, तर काही जणी त्यांच्या आगमनाचे वाकून कृतज्ञतेने स्वागत करताना दिसत आहेत. धर्म–जात निरपेक्ष सेवा केलेल्या वैद्यकीय प्रवासाचे फळ म्हणून बौद्ध, मुस्लिम तसेच इतर सर्व समाजांतील महिलांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.
महिलांकडून उमटणाऱ्या या सकारात्मक प्रतिक्रिया पाहता, डॉ. कोठारी यांच्या निःस्वार्थ सेवेप्रती असलेली कृतज्ञता आणि त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ होत आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून “ही डॉक्टर स्त्री आपल्या शहरासाठी योग्य” असा एकच सूर सर्व प्रभागांतील महिला व्यक्त करताना दिसत आहेत. चिखली शहरातील महिला वर्गाचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी निवडणुकीत महत्त्वाची दिशा ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे…




