2 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक २ मधून मुकेश पडघान यांचा अर्ज दाखल.

चिखली नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्रमांक २ मधून मुकेश पडघान यांचा अर्ज दाखल….

चिखली : चिखली नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून मुकेश पडघान यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज सादर करताना त्यांच्या समर्थकांची उपस्थिती पाहायला मिळाली.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी शहरात सुरू केलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन, युवा पिढीच्या समस्या समजून घेणारा जाणकार व समर्पित युवक म्हणून मुकेश पडघान पुढे येत असल्याचे सांगण्यात आले.

प्रभाग क्रमांक दोनमध्ये नोकरी करणारा मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, लाईट, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या सोडवणुकीवर त्यांचा भर राहणार असल्याचे पडघान यांनी स्पष्ट केले.

आमदार श्वेता महाले पाटील यांचे नेतृत्व, राज्य आणि केंद्र सरकारशी असलेले सत्तासूत्र, तसेच नातेवाईक, आप्तेष्ट व हितचिंतकांचा भरघोस पाठिंबा लक्षात घेता मुकेश पडघान विजयी होतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या