29.4 C
New York
Tuesday, April 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

“संघसंस्काराची नाळ”…कोठारी परिवाराची सेवा आणि आमदार श्वेता महाले यांच्या विकासकामांची जोड..

“संघसंस्काराची नाळ”…कोठारी परिवाराची सेवा आणि आमदार श्वेता महाले यांच्या विकासकामांची जोड..

कोठारी परिवाराची समाजसेवा ही नवीन नाही; ती त्यांच्या रक्तात आणि संस्कारात रुजलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सुरुवातीपासून असलेली त्यांची जुळवाजुळव त्यांच्या कार्यात साफ दिसून येते. संघाचे सेवा, शिस्त, समर्पण आणि समाजभान हे गुण कोठारी कुटुंबाने आयुष्यभर प्रत्यक्षात जगले आहेत.

श्री. विजय कोठारी यांनी सहकार आणि उद्योगाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगार मिळवून दिला. शहरातील सामान्य कुटुंबांना स्थैर्य आणि आधार मिळावा यासाठी त्यांनी अंबिका अर्बन व सहकार क्षेत्रात प्रचंड काम केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे कित्येक घरांना उपजीविकेचा मजबूत आधार मिळाला.

दुसरीकडे, डॉ. संध्या कोठारी यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून हजारो मातांना आणि बालकांना नवजीवन दिले. रुग्णसेवेतील त्यांचे समर्पण, मातृत्वाच्या समस्यांकडे पाहण्याची त्यांची संवेदनशील दृष्टी आणि समाजासाठी काम करण्याची त्यांची तयारी—हे सर्व संघसंस्कारातून आलेलेच आहेत.

कोठारी कुटुंबाची ही सेवा परंपरा आणि समाजासाठीची नाळ पुढे नेण्यासाठी आमदार सौ. श्वेता महाले यांच्या नेतृत्वाखाली अनेक नवीन योजना आकार घेत आहेत. सरकारी योजनांची अंमलबजावणी, गरजूंसाठी सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम आणि समाजजागृती—या सर्व क्षेत्रांत दोघींच्या कार्यामुळे चिखली शहर सामाजिक प्रगतीकडे वेगाने वाटचाल करत आहे.असे चित्र पाहण्यासाठी चिखलीकर उत्सुक आहेत.

संघाच्या बाळकडूने घडवलेली मूल्ये आणि जनतेच्या सेवेसाठी झटणारे हात—चिखली शहरात विकास आणि संस्कार यांचा सुंदर संगम निर्माण करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या