चिखली नगरीत दीपकजी खरात यांच्या वाढदिवसाचा जल्लोष. विकासकामे, महाआरोग्य शिबीर रक्तदान शिबीर आणि सेवाभावाचा उत्सव..!
मा.नगरसेवक दीपकजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज चिखली नगरीमध्ये महाआरोग्य शिबीर तथा भव्य रक्तदान शिबीराच्या माध्यमातून महत्वपूर्ण आरोग्य सेवांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळ पासूनच चिखली शहरातील विविध क्षेत्रातील ज्यामध्ये सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवारांचा गोतावळा आपल्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी दाखल होत आहे.
जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले श्री. दीपकजी खरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर जनतेच्या आशीर्वादाने विविध तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये अनेक सामाजिक उपक्रमातुन जनतेचा उत्सवमय सहभाग दिसून आला. या उपक्रमांना स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विविध संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दीपकजी खरात यांनी बुलढाणा दर्पण न्यूज च्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले, ज्यामध्ये त्यांनी आवार्जून सांगितले कि “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्यासाठी नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडविण्याची संधी आहे.” त्यांनी चिखलीतील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी सतत काम करण्याचा निश्चयही यावेळी व्यक्त केला.



