राहुल बोंद्रे यांनी आपल्या कॉलेजमध्ये योग्य दर्जाचे शिक्षक नेमून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा…
आंदोलन करणारी आमदार, ठेकेदार व राजकीय नेत्यांच्या मुलांना लायकीप्रमाणे रोजगार देण्याची जबाबदारी आमची… निलेश अंजनकर
चिखली/(प्रतिनिधी):देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमीप्रमाणेच खोटे आरोप करून काँग्रेसकडून युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी प्रत्यक्ष वास्तव वेगळेच आहे. मोदी सरकारने “स्टार्टअप इंडिया”, “मेक इन इंडिया”, “स्किल इंडिया”, “डिजिटल इंडिया” अशा अनेक उपक्रमांद्वारे कोट्यवधी युवकांना रोजगार व उद्योगधंद्यांच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. रोजगाराच्या संधी आज केवळ नोकरीपुरत्याच मर्यादित न राहता उद्योजकतेच्या क्षेत्रातही प्रचंड प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. असे भाजप जिल्हा सरचिटणीस श्री निलेश अंजनकर म्हणाले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी स्वतःचे राजकीय व व्यावसायिक अस्तित्व टिकवण्यासाठी इंजिनियरिंग, फार्मसी, नर्सिंग इत्यादी कॉलेजेस उभारली असली तरी त्या कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारून स्वतःचा रोजगार निर्माण केला; मात्र विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी ठेवले. हजारो युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण न देता केवळ पैशाची लूट करण्यात त्यांनी विशेष “कौशल्य” दाखवले, या हजारो विद्यार्थ्यांसाठी योग्य दर्जाचे शिक्षक नेमून कल्याण करायचे सोडून दर्जाहीन व आपली खेटरे उचलणारी लोक चिल्लर पैसे देऊन शिकवायला ठेवणाऱ्या लोकांनीच बेरोजगार निर्माण करणारे कारखाने निर्माण केले आहे असे आरोप स्थानिक पातळीवर सातत्याने होत आहेत,असेही श्री अंजनकर म्हणाले
तसेच युवक काँग्रेसचेच स्थानिक काही नेते असलेल्या चिक्की फाकाडे वा चाहूल फडफडकर सारख्या तथाकथित दादा व भैय्या यांनी शैक्षणिक पात्रता मिळवण्यासाठी स्वतः परीक्षेला न बसता इतरांना पैसे देऊन आपले पेपर लिहून घेतले, अशी चर्चा आजही जनमानसात आहे. तरीही माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या कार्यकाळामध्ये कुणीही उपाशी व बेरोजगार राहणार नाही फक्त त्याच्यामध्ये काम करण्याची कुवत आणी कौशल्य असायला हवे असाच दृष्टिकोन असल्याने काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांनी केलेल्या या आंदोलनाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत यांनी आपले कौशल्य सिद्ध करावे त्यानुसार यांना यांच्या लायकीप्रमाणे आठ तासाचा रोजगार मिळवून देण्यास आम्ही बांधील आहोत व अशा नेत्यांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलणे म्हणजे “उलटे चोर कोतवाल को डाँटे” अशीच स्थिती झाली आहे, असे भाजप नेते निलेश अंजनकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
मोदी सरकार रोजगार निर्मितीवर सतत प्रयत्नशील असताना काँग्रेस नेते स्वतःच्या भ्रष्टाचार, शिक्षण क्षेत्रातील लूट व अपात्रतेवर पडदा टाकण्यासाठी पंतप्रधानांवर आरोप करतात, हीच वस्तुस्थिती आहे. राहुल बोंद्रे यांची सूर्यावर थुंकण्याची सवय जुनी आहे त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या तोंडावर ति थुंकी आपल्याला पडलेली दिसते. तरीपण आमदार, ठेकेदार व जुनी काँग्रेसची पीलावळे यांची नवीन पिढी समोर करून देशाच्या पंतप्रधानांना अवार्च बोलले जात असेल तर अशा मूर्खांनी आपले प्रमाणपत्र घेऊन मुलाखतीसाठी यावे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर त्यांना प्रश्न विचारले जातील व त्यांना नक्कीच रोजगार दिला जाईल असे श्री निलेश अंजनकर म्हणाले.



