चिखलीत काँग्रेसला खिंडार..स्थानिक नेतृत्वावर अविश्वास?
पुन्हा एका मोठ्या नेत्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश संपन्न….
कृषीउत्पन्न बाजार समिती, चिखलीचे माजी सभापती श्री.सचिन शिंगणे यांनी आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते व चिखली विधानसभेच्या आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.या पक्षप्रवेशामुळे चिखलीमधील भारतीय जनता पक्षाला निश्चितच बळ मिळणार असून काँग्रेसला शहरामध्ये मोठे खिंडार पडल्याचे समजले जात आहे…!
आज संपन्न झालेल्या काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशामुळे, स्थानिक काँग्रेस पक्षाची पडझड या माध्यमातून दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चिखली काँग्रेस मधून भाजपात पक्षप्रवेश होत आहे.यामधून चिखली काँग्रेस नेतृत्वावरील कार्यकर्त्यांचा रोष आणि नाराजी प्रत्यक्ष दिसत आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वावर आता अधिक विश्वास न राहिल्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची वाताहत निरंतर सुरू असल्याचे बोलले जात आहे.



