29 C
New York
Tuesday, August 18, 2026

Buy now

spot_img
spot_img

धाड येथे पहलगाम हल्याचा निषेध व हल्ल्यात मृत्यू पावलेल्या सगळ्यांना श्रध्दांजली..

कश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यांमध्ये निष्पाप अशा भारतीय हिंदू पर्यटकांचा जो नरसंहार झाला त्या घटनेचा निषेध चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टी धाड तालुक्याच्या व महायुतीच्या वतीने धाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आला यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणाही देण्यात आल्या . तसेच पाकिस्तानवर कडक कार्यवाही करण्यात यावी अशा भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या यावेळी या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

ज्या जम्मू आणि काश्मीर ला संविधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर राज्यापेक्षा वेगळा दर्जा देण्यास नकार दिला होता आणि कलम 370 ला विरोध केला होता तरीही भारत मातेच्या अभिन्न अंग असलेल्या जम्मू आणि काश्मीर भागाला स्वातंत्र्यानंतर सतत अशांत ठेवत सावत्रपणाची वागणूक मिळत असताना देशाचे खंबीर पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरला अनेक दशकाच्या वनवासातून मुक्तता दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील अखंड भारत निर्माण केला व जम्मू काश्मीर मध्ये पर्यटन, शांतता व विकास साधत भारत “अखंड हिंदुस्थान” च्या दिशेने वाटचाल करत असताना दहशतवादी देशद्रोह्यांकडून हा घात घडवून आणला गेला.

भिकार झालेला शेजारी देश आणि त्यांना देशातून समर्थन देणारे देशद्रोही, धर्मद्रोही यांनी शांत, समृद्ध आणि विकसित होत चाललेल्या भारत भूमीचा अखंड भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला अशांत करून भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी धार्मिक आतंकवाद्यांच्या सहाय्याने जे अघोषित “धर्मयुद्ध” भारत मातेच्या सुपुत्रांचा बळी घेऊन सुरू केले आहे. त्या देशातील व देशाबाहेरील सर्व आतंकवाद्यांना……. करारा जवाब मिलेगा! पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना चिखली, धाड,उदयनगर येथे श्रध्दांजली वाहण्यात आली तसेच हे नृशंन्स हत्याकांड घडवून आणणाऱ्या पाकिस्थान व दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आला.

सदर निषेध कार्यक्रम हा धाड मंडळ अध्यक्ष अनिल जी जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख निलेश गुजर, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर तेजराव नरवाडे साहेब, श्री गजानन देशमुख, श्री विष्णू पाटील वाघ, श्री.योगेश राजपूत, किरण भाऊ सरोदे, प्रवीण वाघ, विशाल विसपुते, बबलू वाघुर्डे,जीतू जैन,अरुण भोंडे, पुरषोत्तम भोंडे, किरण धंदर, नानाभाऊ माळोदे, विलास पालकर, सुगदेव सोनूने, राजू चिकटे, सुनिल पाकळ, राजूभाऊ द्यावणे, मुळेभाऊ, तेजराव पाटील जाधव, सोनु तायडे, तेजराव उबाले, अनिल अपार,तसेच असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या