आ. श्वेताताई महाले यांना मंत्रिपद मिळाल्यास… मंत्री + मंत्रालय = विकास
राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या.महायुतीने महाविकास आघाडीची दानादान उडवून प्रचंड मोठे यश प्राप्त केले. बुलढाणा जिल्ह्यातही सात पैकी सहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आता मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी चर्चा सुरू झाली आहे.जिल्ह्यातील भाजपला विधानसभेमध्ये चार ठिकाणी उमेदवार उभे असलेल्या भाजपला 100% रिझल्ट मिळाला.त्यामुळे सहाजिकच एक मंत्रीपद बुलढाणा जिल्ह्याला नक्की झाले आहे.
आता हे मंत्रीपद पुरुष आमदाराला मिळते की स्त्री आमदाराला याबाबतीत प्रत्येकाच्या समर्थकाकडून सोशल मीडियावर गुलाल आपलाच आणि लाल गाडी आपल्या साहेबांच्या किंवा ताईच्या घरासमोर येणार हे खात्रीपूर्वक सांगितले जात असले तरी, याबाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
परंतु जिल्ह्यातील जेष्ठ राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार जिल्ह्यामध्ये आ. डॉ.संजय कुटे व आ. श्वेता महाले हे दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळच्या वर्तुळातील असल्याने,तसेच युवा व आश्वासक चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी संधी या भाजपाच्या तत्वानुसार या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.
त्यातही निवडून आलेल्या महिला आमदारांची संख्या ही अतिशय नगण्य असल्याने महिला प्रतिनिधित्व म्हणून आमदार श्वेताताई महाले यांना संधी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचे गणित काहीजण मांडत आहेत.आ. श्वेताताई महाले यांचे पती श्री विद्याधर महाले हे मंत्रालय स्तरावर आगामी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असून आमदार श्वेताताई महाले यांना मंत्रिपद मिळाल्यास चिखली तालुका व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी विकासाची एक नवी पहाट उगवू शकते.त्यामुळे आ. श्वेताताई महाले यांना मंत्रिपद मिळावे म्हणून जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी पूजापाठ व नवस देखील सुरु केले आहेत




