सवना येथील नदीवरील पुलामुळे हजारो शेतकऱ्यांची “दैना” झाली दूर…
शेतकरी,विद्यार्थी देत आहेत श्वेताताईंना “दुवा “…
श्री चंदनशेष महाराज यांच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या सवना गावामध्ये अठरापगड जातीजमातीची व प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसाय असलेली हजारो कुटुंब राहतात.या गावातील शेतकऱ्यांची हजारो एकर शेती नदीच्या उत्तरेकडे असून या नदीला पावसाळ्यात सातत्याने पूर येत असल्याने शेतकरी बांधवाचा कित्येक दिवस आपल्या शेतीशी संबंध तुटायचा.त्यामुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत असायचे.त्याचबरोबर या नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चांधई आणी धोडप या गावातील लोकांना बाजारपेठ म्हणून उपलब्ध असलेल्या चिखलीशी असलेला संबंध तुटायचा.चांधई या गावात फक्त पूर्व प्राथमिक शाळा असल्याने इयत्ता चौथी नंतर च्या शिक्षणासाठी तेथील मुलांना व मुलींना सवना किंवा चिखली येथे शिक्षणाकरिता यावे लागते. आणी पावसाळ्यात नदी वाहायला लागली की सवन्यातील शेतकऱ्यांना शेतीत जायला आणी चांधईतील मुलांना शाळेत यायला अशक्य होऊन जायचे. त्यामुळे कित्येक मुलांचे शिक्षण काळजीपोटी अर्धवट राहिले.
आमदार झाल्यानंतर श्वेताताई महाले यांनी अनेकवेळा हा प्रश्न मांडून येथील शेतकऱ्यांची व विद्यार्थ्यांची व्यथा सरकारला समजावण्याचा प्रयत्न केला पण असंवेदनशील असलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारला शेतकरी व विद्यार्थ्यांच्या व्यथा कळल्या नाहीत.अडीच वर्षानंतर जेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आले.तेव्हा सर्वप्रथम आ. श्वेताताई महाले यांनी आपल्या हक्काच्या सरकारकडून आपल्या माणसांसाठी या नदीवर पूल बनवण्याची कल्पना मांडली आणी आज प्रत्यक्षात आलेल्या या पुलामुळे हजारो शेतकऱ्यांची कायमस्वरूपी मागणी पूर्ण झाली.
कित्येक दशकांपासून सुरु असलेली शेतकऱ्यांची परवड शेवटी शेतकऱ्यांच्या लेकीनेच थांबवली.त्यामुळे वळती, सवना चांधई व धोडप या गावातील सर्व शेतकरी, विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांच्याकडून आपली हक्काची बहीण असलेल्या श्वेताताई महाले यांना दुवा मिळत असून, अशा विकास कामामुळेच आमदार श्वेता ताई महाले यांना ही निवडणूक अतिशय सोपी जाणार असल्याचे व आम्ही श्वेताताई यांनाच निवडून आणणार असल्याचे या भागातील सर्व लोक मोठ्या उत्साहाने सांगतात.



