3.6 C
New York
Monday, February 16, 2026

Buy now

spot_img
spot_img

राहुल बोंद्रे यांना श्वेताताईच्या विरोधाची “कावीळ” …………  “कोरा चेक आम्हाला द्या आम्ही तो जिल्हा सहकारी बँकेला नेऊन देतो”…. कृष्णकुमार सपकाळ.

राहुल बोंद्रे यांना श्वेताताईच्या विरोधाची “कावीळ”

कोरा चेक आम्हाला द्या आम्ही तो जिल्हा सहकारी बँकेला नेऊन देतो…. कृष्णकुमार सपकाळ

काल दसरा सणाच्या दिवशी माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी प्लॅन करून आमदार श्वेताताई महाले यांना बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र रचले त्याचा अखेर भांडाफोड झाला असून राहुल बोन्द्रे हे सत्तेपासून दूर गेल्यानंतर अगोदरच बेताल वागत होते,पण यावेळेला दिल्ली,मुंबईच्या अनेक चकरा मारल्यांनतरही तिकीट भेटण्याचीही शक्यता दिसत नसल्याने राहुल बोन्द्रे यांचा तोल सुटत चालला असून त्यांना सर्व ठिकाणी त्यांच्या राजकीय पतनास कारणीभूत ठरलेल्या आमदार श्वेताताई दिसत असल्याने, आपण त्यांना झालेली “श्वेताताईंच्या विरोधाची कावीळ” बरी व्हावी म्हणून चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेण्याचा सल्ला देऊ शकतो, असा टोमणा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस कृष्णकुमार सपकाळ यांनी लगावला.

दसरा सणासारख्या शुभ मुहूर्ताला अगदी शत्रूचेही अहित न पाहणाऱ्या आपल्या संस्कृतीत, राहुल बोंद्रे या माणसाने आपल्या षडयंत्रासाठी काही गरिबांच्या खांद्याचा वापर केला.आणि वर आपण सामाजिक बांधिलकी जपल्याचे पत्र स्वतःच माध्यमांना पाठवत आहे, मुकुल वासनिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिल्लीला जावून पार्टी करणारे माजी आमदार राहुल बोन्द्रे यांनी विकासाच्या कोणत्याही मुद्द्यावर आपण श्वेताताईंना टक्कर देऊ शकत नसल्याचे पाहून आता अगदी खालच्या स्तरावर उतरून,जी नौटंकी चालवली आहे ती सर्व जनतेच्या लक्षात आली असून, जनता या विकृत राजकारणाला बळी पडणार नाही.

काल स्वतःच्याच फेसबुक लाईव्ह मध्ये “आपण कोरा चेक द्यायला तयार असल्याचे त्यांनी तीनदा सांगितले.हाच कोरा चेक त्यांनी जिल्हा सहकारी बँकेला दिला तर हजारो शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे भले होईल.त्यामुळे हा कोरा चेक त्यांनी आम्हाला द्यावा आम्ही जिल्हा सहकारी बँकेला तो नेऊन देतो,” असे आवाहनही श्री सपकाळ यांनी केले

Related Articles

ताज्या बातम्या