‘राजकारण हे मुळात खराब असतं आणि सगळीच राजकारणी एकाच लायकीचे असतात’, सहज बोलता बोलता असा शिक्का आपण सर्व राजकारणी व्यक्तींवर लावून देतो.याला बऱ्याच अंशी आपण अनेक दशके राजकारणाचा जो वाईट अनुभव घेतला तोही कारणीभूत आहे.परंतु जेव्हा आपल्या जवळचे कुणीतरी मृत्युच्या अगदी जवळ असते,आणी सर्व अपेक्षा संपतात तेव्हा ईश्वरी लीला सुरु होतात,व अशावेळी समोर आलेला मदतीचा हात हा साक्षात भगवंताने आपल्यासाठी पाठविलेला देवदूताचाच असतो.
असाच काहीसा अनुभव गांगलगाव येथील गजानन रामदास म्हस्के यांना आला,गांगलगाव येथील गजानन म्हस्के यांना किडनीवर,लिव्हरवर सूज आलेली होती,त्यामुळेच स्वादुपिंडालाही संसर्ग झाला,अचानक आलेले आजारपण व घरची अतिशय हलाखीची आर्थिक परिस्थिती असल्यामुळे आलेल्या संकटाने श्री म्हस्के व कुटुंबीय चिंतीत होते, ही बाब गांगलगाव येथीलच श्री गजेंद्र म्हस्के यांनी आमदार श्वेताताई महाले यांच्या कानावर घातली, मुळातच संवेदनशील असलेल्या श्वेताताई महाले यांनी, आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य आजारी आहे या तत्परतेने ‘कमलनयन बजाज हॉस्पिटल’ छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क करून गजानन म्हस्के यांना योग्य ते उपचार मिळावेत म्हणून संबंधित तज्ञ व डॉक्टर यांना विनंती केली,तसेच आवश्यक ते उपचार करण्यासाठी पेशंट यांना माहितीही न होऊ देता सर्व आर्थिक मदतही केली. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे श्री गजानन म्हस्के हे पूर्णपणे बरे होऊन परतले, कुटुंबाचा आधार असलेले गजानन म्हस्के तन्दुरुस्त होऊन परतल्याने त्यांचे कुटुंब,नातेवाईक व समस्त गावात अतिशय आनंद झाला आहे.
म्हस्के कुटुंबीयांच्या आजारपणात “आधार” बनून आलेल्या जनसेवक श्वेताताई महाले यांनी पार पाडलेले त्यांचे ‘कर्तव्य’ हे मोठे उपकारच होते अशीच भावना सर्व ग्रामवासी व परिसरात असूनही “हे आपले कर्तव्यच आहे” असे म्हणणाऱ्या आमदार महाले यांनी,लोकप्रतिनिधीने खरोखर काय कामे करायला हवी याचा वस्तूपाठ घालून दिला आहे.



