4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

पुतळ्यांचे “ऑडिट” झाले आहे, कंत्राटदार यांनी सर्व सर्टिफिकेट जमा केले आहेत…. मुख्याधिकारी पांडे.

दिनांक 19 सप्टेंबर रोजी,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या आमंत्रणावरून शहरामध्ये नवीन उभारण्यात आलेल्या व सौंदर्यकरण करण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यासाठी येत आहेत.

महापुरुषांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्या अगोदर सर्व पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे,यासाठी बुलढाणा येथे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते हे जिल्हाधिकारी यांना आज भेटले होते.त्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये,महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेत्यांनीअप्रत्यक्षपणे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका करत,मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अपघातासारखी घटना बुलढाणा येथे घडू नये म्हणून पुतळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट ची मागणी केली होती.

या पुतळे अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून मुख्याधिकारी नगरपरिषद बुलढाणा यांचे नाव असल्यामुळे,बुलढाणा दर्पण यांनी त्यांच्याशी संपर्क केला असता,त्यांनी या पुतळ्याच्या ऑडिट विषयी माहिती दिली.

मुख्याधिकारी पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात नवीन अनावरित करण्यात येणाऱ्या सर्व 18 पुतळ्यांचे कंत्राटदाराकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात आले आहे.थर्डपार्टी ऑडिट म्हणजे काय हे नेमके सांगताना मुख्याधिकारी पांडे म्हणाले,की सरकारने नेमलेल्या एजन्सीमार्फत कंत्राटदारांनी पुतळ्याचे सर्वांगीन ऑडिट करून पुतळ्यांच्या योग्य दर्जाविषयी माहिती सादर करणे म्हणजे थर्ड पार्टी ऑडिट होय,आणी बुलढाण्यामध्ये आलेल्या पुतळ्यांचे ऑडिट गव्हर्मेंट पॉलीटेकनिक कॉलेज,नांदेड यांचेकडून करण्यात आले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर प्राप्त झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुतळ्यांचे अनावरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या