-0.5 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली स्वच्छतेकडे वेगाने… अनधिकृत होर्डिंग हटवले, शहराचा चेहरा उजळला

चिखली स्वच्छतेकडे वेगाने… अनधिकृत होर्डिंग हटवले, शहराचा चेहरा उजळला

चिखली शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. पंडित दादा देशमुख यांच्या ५ जानेवारी रोजी पार पडलेल्या पदग्रहणानंतर शहराच्या कारभारात सकारात्मक बदल स्पष्टपणे जाणवू लागला आहे. पदभार स्वीकारताच “स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध चिखली” हे ध्येय ठेवून नगरपरिषदेने कामाला वेग दिला असून त्याचे प्रत्यक्ष परिणाम आता रस्त्यांवर दिसत आहेत.

नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रत्येक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची दररोज सकाळी स्वच्छता केली जात आहे. विशेष बाब म्हणजे ही स्वच्छता केवळ कागदोपत्री न राहता स्थानिक नगरसेवक स्वतः मैदानात उतरून कामावर लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील कचरा, धूळ व साचलेली घाण लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

त्याचबरोबर शहरभर पसरलेल्या अनधिकृत होर्डिंग, बॅनर व फलकांवर नगरपरिषदेने कठोर कारवाई करत ते हटविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यांच्या कडेला, चौकात व विजेच्या खांबांवर लावलेले हे फलक केवळ शहराचे सौंदर्य बिघडवत नव्हते, तर वाहतुकीस अडथळा निर्माण करून अपघातांचा धोका वाढवत होते. काही ठिकाणी तर ड्रायव्हरचे दृश्य झाकले जाई, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत होते.

या अनधिकृत होर्डिंगमुळे पावसाळ्यात ड्रेनेज साफसफाईत अडथळे येत, वाऱ्यामुळे बॅनर तुटून रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांना धोका निर्माण होत असे. शिवाय शहराची शिस्त व सौंदर्य दोन्ही धोक्यात येत होते. आता हे सगळे फलक हटवल्याने चिखली अधिक खुली, स्वच्छ आणि सुरक्षित दिसू लागली आहे.

या ठोस कारवाईबद्दल शहरवासीयांकडून नगरपरिषद व नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांचे कौतुक होत आहे. “पहिल्याच काही दिवसांत असे निर्णय म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रशासनाची सुरुवात आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख यांनी सुरू केलेल्या कामकाजामुळे प्रशासन अधिक गतिमान झाले असून जनतेची कामे त्वरित मार्गी लागत असल्याचे चित्र आहे. स्वच्छता, शिस्त व सुरक्षितता या तीन सूत्रांवर शहराचा नवा प्रवास सुरू झाला असून चिखली आता खऱ्या अर्थाने “सुंदर शहर” बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या