0.7 C
New York
Friday, February 13, 2026

Buy now

spot_img
spot_img

मेहकरचा ‘डिफेंडर’ प्रश्न, गारोळे की ‘कार’ओळे

मेहकरचा ‘डिफेंडर’ प्रश्न

मेहकर शहराला नुकतेच नवे नगराध्यक्ष लाभले आणि त्याचसोबत शहराच्या रस्त्यांवर श्रीमंतीची धूळ उडू लागली. नगराध्यक्षपदी विराजमान होताच किशोर गारोळे यांनी तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीची डिफेंडर गाडी विकत घेतल्याची चर्चा सध्या चहाच्या टपरीपासून नगरपालिकेच्या दालनापर्यंत रंगली आहे.

जनतेचा सेवक म्हणवून घेणारा नगराध्यक्ष पाच माणसे बसतील अशा गाडीसाठी दोन कोटींचा सेवाभाव दाखवतो, ही बाब अनेकांच्या पचनी पडत नाही.

मेहकरसारख्या शहरात — जिथे केंद्रीय कॅबिनेट मंत्री राहतात — तिथेही अद्याप अशी डिफेंडर गाडी दिसत नाही. केंद्रीय मंत्री असलेले प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी ५२ हजार रुपयांचा चष्मा वापरला म्हणून जिल्ह्यात खलबते माजली होती. पण आज एक साधा नगराध्यक्ष दोन कोटींच्या गाडीतून मिरवत असताना मात्र सगळेच शांत आहेत — ही शांतता खरी की सोयीची, हा प्रश्न उपस्थित होतो.

जनतेला इम्प्रेस करण्यासाठी, किंवा “माझ्याकडे किती पैसा आहे” हे दाखवण्यासाठी एवढ्या महागड्या गाड्यांचा वापर करणारा नेता जनसामान्यांच्या भावना समजून घेणारा कसा ठरू शकतो? ज्यागाडीत सामान्य माणसाला बसायलाही संकोच वाटावा, त्या गाडीतून येणारा नेता लोकांच्या प्रश्नांपर्यंत कसा पोहोचणार, हा खरा गूढ प्रश्न आहे.

राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण हे सूत्र नवे नाही; पण पूर्वी किमान पैशाचे प्रदर्शन न करता राजकारण चालत होते. आज मात्र एका नगराध्यक्षाने दोन कोटींची गाडी घेतल्याने उद्या इतर नगराध्यक्षही “आपण किती कोटींवर आहोत” याची स्पर्धा सुरू करतील, यात शंका नाही.

अशा परिस्थितीत मत विकून सत्ता दिलेल्या भोळ्या मतदारांनी आता नगराध्यक्षांकडून सेवा अपेक्षित ठेवावी की शो-रूम अनुभव, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे…

Related Articles

ताज्या बातम्या