खेळ सूतगिरणीचा !! राहुल बोंद्रे यांनी अनुदान घेतले पूर्ण,बांधकाम केले अर्धे, बाकीचा पैसा गेला कुठे? चौकशी होणार का?
राहुल बोंद्रे यांनी मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीसाठी २५,००० चात्यांची क्षमता दाखवून ५ टक्के भागधारकांचे भांडवल सोडून, ४५ टक्के शासन अनुदान आणि ५० टक्के शासन कर्ज अशा स्वरूपात तब्बल ९५ टक्के निधी शासनाकडून उचलला अशी माहिती आहे,मात्र प्रत्यक्षात केवळ १३,००० चाते असलेलीच सूतगिरणीची इमारत उभारण्यात आली. उर्वरित निधीचा नेमका उपयोग कुठे झाला?…
मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीवर जप्तीचा आदेश येऊन गेलेला आहे. शासनाची ४५ टक्के सबसिडी आणि शासनाकडून घेतलेले ५० टक्के कर्ज म्हणजेच सामान्य गोरगरीब शेतकरी जनतेचा जवळजवळ सुमारे ५५ कोटी रुपयांचा पैसा या प्रकल्पात गुंतवला गेला होता. या निधीतून अनेक तरुणांना रोजगार देता आला असता, मतदारसंघाचा आर्थिक चेहरामोहरा बदलता आला असता…
या सूतगिरणीसाठी राहुल बोंद्रे यांनी शासनाकडून पूर्ण सबसिडी मिळवली. राहुल बोंद्रे यांनी भागधारकांकडून पैसा गोळा केला, राहुल बोंद्रे यांनी मायबाप गोरगरीब जनतेचा पैसा असलेल्या जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेतले व ते कर्ज डुबवले असे म्हटले जाते. मग एवढा 55 कोटी रुपयाचा पैसा गेला कुठे? विधानसभा निवडणुकीत खूप पैसा वाटला गेला असे राहुल बोन्द्रे म्हणाले होते हा पैसा निवडणुकांसाठी तर वापरला गेला नाही?
आमदार श्वेता महाले यांनी केलेल्या प्रत्येक विकास कामासाठी एसआयटी चौकशी मागणारे राहुल बोंद्रे यांनी आपल्या सहकारी सूतगिरणीसाठी आणि सूतगिरणीच्या माध्यमातून गायब झालेल्या अर्ध्या पैशाचे काय झाले हे सांगण्यासाठी आता पत्रकार परिषद घ्यावी अशी मागणी जनतेतून येत आहे.




