11.5 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

“सारंगवाडी”… खरंच भ्रष्टाचार उघड करण्याची तळमळ की फक्त राजकीय मळमळ!

“सारंगवाडी”… खरंच भ्रष्टाचार उघड करण्याची तळमळ की फक्त राजकीय मळमळ!

राहुल बोन्द्रे यांच्या हेतूबद्दल जनमाणसात शंका… चला उघडूया जुनी पाने..!

काल विधानसभेमध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी सारंगवाडी संचय तलाव भ्रष्टाचाराबाबत लक्षवेधी मांडली, आणि संबंधित खात्याचे मंत्री यांना या प्रकल्पामध्ये झालेल्या विविध भ्रष्टाचाराबद्दल अवगत करून त्याचे गांभीर्य दाखवून दिले. त्याला प्रत्युत्तर म्हणून माननीय मंत्री महोदयांनी या प्रकल्पामध्ये झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्याची आणि त्या विशेष तपास पथकाला तीन महिने एवढ्या कालावधीत अहवाल सादर करण्याचे सभागृहातच घोषित केले.

भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही हे आपल्या कृतीद्वारे दाखवून देणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ श्वेता महाले पाटील यांच्या याबाबतच्या बातम्या व व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसारित झाले.

परंतु नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मुद्दा नाही हे भाजप जाणून असल्याने, माजी आमदार’ ही भळभळती जखम डोक्यावर घेऊन विरोधकाच्या भूमिकेत असलेले माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन सारंगवाडी भ्रष्टाचार प्रकरणात आमदार सौ श्वेता महाले व त्यांचे पती यांना ओढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

आमदार श्वेता महाले लक्षवेधी मांडत असताना त्या लक्षवेधीचे श्रेय घेण्यासाठी (उतावीळ?) राहुल बोन्द्रे यांनी आज पुन्हा फेसबुक लाईव्ह केले.लक्षवेधी मांडण्यासाठी, लक्षवेधीचे श्रेय घेण्यासाठी व्यक्तीला आमदार असणे गरजेचे आहे हे मूळ तत्व विसरलेल्या राहुल बोंद्रे यांना काय म्हणावे?असा प्रश्न बऱ्याच भाजप कार्यकर्त्यांनी विचारला तरीही हेतू स्वच्छ असेल तर हरकत नसावी.

2009 ला सुरू झालेला सारंगवाडी प्रकल्प हा तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री भाऊसाहेब फुंडकर यांनी प्रस्तावित केलेला व आणलेला प्रकल्प असल्याने तेव्हाच्या काँग्रेस सरकारने या प्रकल्पाला निधी मिळू नये यासाठी आपल्या सत्तेचा वापर केला. 2009 ते 2019 पर्यंत राहुल बोंद्रे आमदार असताना हा प्रकल्प का पूर्ण झाला नाही? राहुल बोंद्रे आमदार असताना या प्रकल्पाबाबत झोपी गेलेले होते का? की राहुल बोंद्रे यांचेच या प्रकरणात लागेबांधे आहेत? आणि सौ श्वेता महाले पाटील आमदार झाल्यानंतर त्यांच्या प्रखर भ्रष्टाचार विरोधी वर्तनुकीमुळे राहुल बोन्द्रे यांना मिळणारा प्रसाद बंद झाला म्हणून तर आमदारकी गेल्यानंतर गोंगाट सुरू झाला नसेल?

जो मुद्दा लक्षवेधीमध्ये सुटला असं राहुल बोंद्रे यांचं म्हणणं आहे त्याबद्दल जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दीड वर्षापूर्वी आमदार महोदया यांच्याकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे आणि त्यामध्ये या दंडाची रक्कम संबंधितांकडून त्वरित वसूल करण्यात यावी असेही आमदारांनी सुचित केले आहे. कंत्राट दराला रॉयल्टी न भरल्यामुळे जो 22 कोटीचा दंड झाला त्यासंबंधी आमदार सौ महाले यांनी जिल्हाधिकारी यांना वसुली संबंधात पत्र दिल्याचे लेखी पुरावे आहेत परंतु स्वतःच्या शिक्षण संस्था उभारताना राहुल बोंद्रे यांनी कोणतेही प्रकारची रॉयल्टी भरलेली नाही हे सिद्ध झाल्यानंतरही तोंडाने कायद्याचे गुणगान करणाऱ्या राहुल बोन्द्रेनी ही रॉयल्टी कधी भरणार आहे हेही जरा सांगावे?असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.

भाजप सरकारने भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घातले नाही असे आ. महाले म्हणतात म्हणून 2009 पासून सुरू असलेल्या आणी तेव्हापासून दहा वर्ष राहुल बोन्द्रे आमदार असतानाही प्रकल्पातील भ्रष्टाचार फक्त भाजपचे आमदार स्पष्ट मांडू शकतात कारण भ्रष्टाचाराबाबत “झिरो इंटॉलरन्स” हेच भाजप सरकारचे आणि चिखलीच्या आमदार असलेल्या श्वेता महाले पाटील यांचेही तत्त्व राहिले आहे. राहुल बोंद्रे यांनी केलेल्या जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराबाबतही आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनीच आवाज उठवला. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ऊर बडवणाऱ्या प्रत्येकाला व माजी आमदार राहुल बोन्द्रे यांना देखील भ्रष्टाचाराचे पुरावे द्यावे, त्या भ्रष्टाचारा विरोधात अतिशय कडक कार्यवाही होईल याची तजविज करू असे आवाहन आ. सौ. श्वेता महाले पाटील यांनीच केले आहे.

परंतु राहुल बोंद्रे यांना प्रत्येक विकास कामाच्या सुरुवातीला भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून भुई धोपटण्याची सवय लागली असल्याने व चालू विकास कामांना खीळ घालण्याचे कसब प्राप्त असल्याने त्यांच्याकडे जनता आता दुर्लक्ष करू लागली आहे त्यामुळे चर्चेत राहण्याकरता ते अशा बाबी सातत्याने करत आहेत.असे आ. सौ. महाले म्हणाल्या.

सारंगवाडी प्रकल्पातील भ्रष्टाचार हा भाजप सरकारमधील भ्रष्टाचार आहे असे सातत्याने सांगत असलेल्या राहुल बोंद्रे यांनी हा प्रकल्प 2009 ला सुरू झाला आणि 2009 ते 2019 पर्यंत ते स्वतः चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते व 2019 पासून पुढे तीन वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते म्हणजे त्यांचे सरकार होते हा विसर पडलेला दिसत आहे. त्यामुळे खरंतर हा राहुल बोंद्रे आणि महाविकास आघाडी यांचा भ्रष्टाचार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.असेही आ. सौ. महाले म्हणाल्या.

भ्रष्टाचाराबाबत भाजपचे आणि भाजपच्या सर्व आमदारांचे नेहमीच झिरो इंटॉलरन्स राहिलेले आहे. चिखलीतही ज्या ठिकाणी भ्रष्टाचाराबद्दल कोणीही छोटीही तक्रार केली असेल तरी त्या तक्रारीवर ताबडतोब कृती करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्येक काम अतिशय काटेकोर व पारदर्शक पद्धतीने होईल यासाठी सूचना करण्याचे काम आमदार म्हणून मी सदैव करत असते..असे सौ. महाले म्हणाल्या.

Related Articles

ताज्या बातम्या