बुलढाणा दर्पण: ((चिखली प्रतिनिधी))
महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या लढ्याला आमदार.सौ.श्वेता महाले पाटील यांचा जाहीर पाठिंबा.
आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर पत्रकाद्वारे पाठिंब्याची घोषणा.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की…
राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजेत, ही मागणी घेऊन, जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा गावाचे श्री.दीपकजी भीमराव बोऱ्हाडे यांनी, धनगर समाजाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे.
समाजासाठी संघर्षतर लढा उभारून आवाज उठविणाऱ्या श्री.दीपकजी बोऱ्हाडे यांच्या लढ्याला चिखलीच्या आमदार.सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
या बद्दलची त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरील पोस्ट अशी आहे..
“धनगर समाजबांधवांच्या आरक्षण लढ्याला माझा जाहीर पाठींबा”
धनगर समाजबांधवांना अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी श्री. दीपकजी भीमराव बोर्हाडे (रा. गोंधनखेडा ता. जाफराबाद जि. जालना) यांच्या लढ्याला माझा संपूर्ण पाठिंबा एका पत्राद्वारे जाहीर केला आहे.
श्री. दीपकजी बोर्हाडे यांचा उपोषणाचा निर्णय अत्यंत धाडसी व त्यागमय आहे.
या आंदोलनाद्वारे समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला आहे. हा संघर्ष फक्त धनगर समाजाचा नसून न्याय व समानतेसाठी झगडणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.
धनगर समाजाला न्याय मिळावा आणि समाजातील भावी पिढ्यांना शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक संधी समान पातळीवर मिळाव्यात, हीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व आमचे महायुतीचे सरकार यांचीही भूमिका आहे.
आपल्या या लढ्याला आम्ही ठाम पाठिंबा देत आहोत. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यास मी कटिबद्ध आहे.



