4.2 C
New York
Thursday, April 9, 2026

Buy now

spot_img
spot_img

चिखली शहरात नवरात्री निमित्त भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन. हजारो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी.

चिखली शहरात नवरात्री निमित्त भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन. हजारो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी.

चिखली मतदार संघाच्या विकास कन्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात…

भारतीय जनता पार्टी चिखली शहर अध्यक्ष श्री. सागरभैय्या पुरोहित यांच्या द्वारे आयोजित, भव्य गरबा महोत्सव आजपासून सुरू होत आहे.

विविध धार्मिक, सांस्कृतिक सणांच्या उत्सवासाठी प्रसिद्ध असलेले चिखली शहर याही वर्षी नाविन्यपूर्ण स्वरूपात विविध माध्यमातून नवरात्र उत्सव साजरा करीत आहे.

यावर्षीच्या आदिशक्तीच्या जागरासाठी उत्सव प्रिय चिखलीकरांना, भाजपा चिखली शहराध्यक्ष श्री सागर भैय्या पुरोहित यांच्याद्वारे, क्रीडा संकुल चिखली येथील प्रशस्त मैदानावर भव्य गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा दिनांक 23 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोंबर या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे.

गरबा – दांडिया स्पर्धेत हजारो रुपयांची पारितोषके.

या गरबा महोत्सवातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे, चिखली शहरातील मान्यवरांकडून तथा आयोजकांकडून विविध स्वरूपातील आकर्षक पारितोषिक स्पर्धकांसाठी ठेवण्यात आलेली आहे.

संस्कृती, राष्ट्रप्रेम, भक्ती शक्तीच्या जागराच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवासाठी चिखलीतल्या शेकडो स्पर्धकांनी आपले नाव नोंदवून तयारी सुरू केली आहे.

गेल्या महिनाभरापासून श्री. सागर पुरोहित यांच्या नियोजनातून गरबा स्पर्धेची तयारी सुरू आहे. आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी भव्य गरबा स्पर्धेला सुरुवात होत आहे. तरी चिखली नगरीमधील तसेच परिसरातील नागरिकांनी या गरबा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मनमुराद आनंद घेण्याचे आवाहन श्री सागर पुरोहित यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या