स्व. दयासागरजी महाले यांना विविध सामाजिक कार्यक्रमांमधून श्रध्दांजली….
*चिखली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप*
राजकारण, समाजकारण यामध्ये कार्यरत राहूनसुद्धा “अजातशत्रू” राहिलेले स्वर्गीय दयासागरजी महाले यांना काल विविध कार्यक्रमामधून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

चिखली शहर भाजप कार्यकारणी तर्फे उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे रुग्णांना फळ वाटप करून स्व. दयासागरजी यांना श्रद्धान्जली वाहण्यात आली.यावेळी श्री अंकुशराव पाटील, श्री पंडितराव देशमुख, श्री युवराज भुसारी,श्री सागर पुरोहित,विजय वॉलेकर,विलास चव्हाण,संदीप पाटील,नीरज गायकवाड, शिवराज पाटील,रितेश पवार, सौरभ पडघान, नीरज गायकवाड, रितेश पवार, आकाश चुनावाले, डॉ. उमेश सावजी ,डॉक्टर अमोल राजपूत, विशाल भगत व सोनू सुरडकर इत्यादी हजर होते.
*भाजीविक्रेत्या भगिनींना साडी वाटप*

निःस्वार्थी, निगर्वी असलेले आणी राजकारणात राहूनही निष्कलंक राहिलेल्या स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजप महिला मोर्चा आणी तोरणा महिला अर्बन स्थानिक संचालक मंडळाच्या वतीने चिखली शहरातील डिपी रोड, पारधी बाबा रोड येथे भाजिविक्रीचे काम करणाऱ्या भाजिविक्रेत्या भगिनींना साडी वाटप करण्यात आले.याप्रसंगी सौ. कांचन पाटील, सौ.ज्ञानेश्वरी सुनील केसकर, सौ.सिंधु अंकुश तायडे, सौ.निता जैन,सौ. निता सोळंकी सौ.मालती शिराळे, सौ छाया सुभाष खरात, सौ. वैशाली जाधव,सौ.तृप्ती गोसावी ,सौ.सुनिता शिंगणे, तथा अन्य महिला सदस्य उपस्थित होत्या.
*तोरणा महिला अर्बन ,चिखली येथे स्मृतींना उजाळा*

स्वर्गीय दयासागर जी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिखली येथे तोरणा महिला अर्बन पतसंस्थेमध्ये स्वर्गीय दयासागरची महाले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.आमदार सौ श्वेताताई महाले यांचे वडील श्री अंकुशराव पाटील यांनी स्व. दयासागरजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.याप्रसंगी श्री अंकुशराव पाटील, तोरणा महिला अर्बन शाखा चिखलीचे व्यवस्थापक श्री सावळे तसेच संबंधित सर्व कर्मचारी वर्ग हजर होते.
*सेवा संकल्प येथे स्व. दयासागरजी महाले यांचे नावाने स्वयंपाकगृहाचे भूमिपूजन*

स्वर्गीय दयासागरजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पळसखेड सपकाळ येथे मनोरुग्न व वंचितांना आधार देणाऱ्या सेवा संकल्प प्रतिष्ठानमध्ये स्व. दयासागर जी महाले यांच्या नावाने 25 लक्ष रुपयांच्या स्वयंपाक गृहाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी श्री अंकुशराव पाटील, श्रीमती पुष्पलताताई दयासागरजी महाले,सौ. मीनाताई अंकुशराव पाटील,श्री कृष्णकुमार सपकाळ, सेवा संकल्प प्रतिष्ठानाचे नंदू पालवे,सौ. आरती पालवे, श्री बळीराम काळे, श्री नीलकंठ महाले,विष्णू आव्हाळे,ओम वायाळ व इतर हजर होते.
*दिव्या फाउंडेशन येथे वंचिताना भोजन*
स्व.दयासागरजी महाले यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त वरवंड येथील वंचिताना आधार देणाऱ्या दिव्या फाउंडेशन येथे तेथील मनोरुग्ण व वंचित बांधवाना भोजन देण्यात आले.व स्मृतिशेष स्व. दयासागरजी महाले यांच्या आत्म्याला चिरंतन शांतता मिळावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.



