आ. सौ. महाले व श्री विद्याधर महाले यांच्यामुळे अनेक कुटुंबाना मिळाला “आधार”….
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विशेषतः पाण्यात बुडून मृत्यू होणे, कीटकनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने किंवा वीज पडणे, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या, जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्यांच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यु झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते, अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस / त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता शासनाकडून रु. २ लाख पर्यंत लाभ देण्यात येतो. सदर सुधारित योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्ती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकुण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत लाभ मिळण्याचे प्रावधान आहे.
या योजनेअंतर्गत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थ्यांना लाभ प्राप्त झालेला असून, या प्रसंगी आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांना संपूर्ण मतदारसंघात “हक्काची बहीण” का म्हटल्या जाते हे लक्षात येते.मतदार संघामध्ये कुठेही अनुचित घटना वा अपघात घडला तर शरीराने पोहचता आले नाही तरी त्याच घटनेत मन गुंतलेल्या आ. श्वेताताई महाले त्या ठिकाणी मदत कशी पोहचेल याची तजवीज नक्कीच करतात.यातूनच संपूर्ण मतदारसंघात दुर्दैवी घटना घडलेल्या प्रत्येकाला शासनाकडून शक्य ती मदत देण्याचा प्रयत्न आमदार सौ. श्वेताताई विद्याधर महाले यांनी केला आहे.याचेच फलित म्हणून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात जास्त गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी चिखली तालुक्यातील असून अनेक शेतकरी कुटुंबांना या मदतीतून आधार देण्याचे काम आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केले आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा 50 लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये प्रमाणे सुमारे एक कोटी रुपयाची मदत शासनाकडून सन 2024-25 मध्ये करण्यात आली आहे.बुलढाणा व इतर तालुक्यातील मंजूर प्रस्ताव संख्या 20 च्या वर जात नसतांना चिखली तालुक्यातून आ. सौ. श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 50 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे.आ. सौ. महाले यांची कार्यकुशलता व लोक हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रवृत्ती तसेच जत-धर्म-पन्थ- निरपेक्ष काम करण्याची श्री महाले यांचा स्वभाव यांच्यामुळेच अनेक गरीब कुटुंबाना अगदी दुःखाच्या व गरजेच्या वेळेला मदत मिळाल्याने अनेक जणांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.



