- आ. महाले यांच्या पाठपुराव्यामुळे पुनर्वसित गावांना मिळाली उर्वरित दहा कोटी रक्कम…
खडकपूर्णा प्रकल्प अंतर्गत चिखली तालुक्यातील घाणमोड, मानमोड, व पांढरदेव या गावातील काही घरांचे पुनर्वसन करण्यात आले होते.पुनर्वसन करतेवेळी भूसंपादन मोबदला म्हणून या गावातील लोकांना वाटप करण्यात आलेला मोबदला शासनाच्या सद्य तरतूदीनुसार कमी असून या परिस्थितीत योग्य मूल्यमापन करून राहिलेला मोबदला त्वरित देण्यात यावा याकरिता आमदार सौ. श्वेता ताई महाले यांनी वारंवार वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता.आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून सद्य तरतुदीनुसार योग्य मूल्यमापन झाल्यानंतर उर्वरित रक्कम भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मौजे घानमोड, मानमोड, पांढरदेव येथील पुनर्वसन गावांचे निवाडा रक्कम ही मागील ३ वर्षापासून निधी अभावी प्रलंबित होती.मागील वर्षी ३०.११ कोटी रुपये जमा करण्यात आले आणि उर्वरीत रक्कम १०.०४ कोटी रुपये आज रोजी उपविभागीय कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यात आले..एकूण निवाडा रक्कम ४०.१५ कोटी रुपये झाली असून याप्रकरणी आ. सौ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या वारंवार पाठपुराव्यामुळे या गावातील पुनर्वसित लोकांना संपूर्ण मोबदला प्राप्त झाल्याने आ. सौ. श्वेताताई महाले यांचे आभार व्यक्त केल्या जात आहे.
खडकपूर्णा प्रकल्प अंतर्गत पुनर्वसित झालेल्या गावांमध्ये घानमोड येथील 72 घरे, मानमोड येथील 120 घरे व पांढरदेव येथील 63 घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, ह्या गावातील या घरांना पुनर्वसनाची भूसंपादनाची मोबदला रक्कम संपूर्ण रक्कम आता प्राप्त झाली आहे.



