आ.आकाश फुंडकर यांना मंत्रिपद!भाऊसाहेबांची “पुण्याई” कामी आली?
अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा!
एका सिनेमामध्ये अतिशय हिट झालेला हा डायलॉग होता.परंतु सिनेमा आणि प्रत्यक्ष जीवन यामध्ये खूप अंतर असते याचा प्रत्यय आज मंत्रिमंडळामध्ये शपथविधी झालेल्या महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाकडे पाहून आल्याशिवाय राहत नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येणार हे आपली ब्रीद खरे करून दाखवले.पर आधुनिक विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काही तरुण, आश्वासक आणि महाराष्ट्राचे भविष्य बनू शकतील अशा चेहऱ्यांना संधी मिळेल अशी शक्यता होती.परंतु मंत्रिमंडळाचा चेहरा मोहरा बघितला तर जवळजवळ सर्वच चेहरे हे एकतर जुने किंवा जुन्यांचे वारस या पद्धतीनेच भरलेली आढळतात.
बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी सहा जागावर विजय मिळाल्यानंतर महायुतीमध्ये भाजपाचा एक मंत्री नक्की राहील याविषयी कुणालाही साशंकता नव्हती.चैनसुख संचेती, संजय कुटे, आकाश फुंडकर आणि श्वेताताई महाले असा क्रम किती वेळा निवडून आले याबाबतीत लागत असला तरीही आ. संजय कुटे,आ. श्वेताताई महाले यांना मंत्रिमंडळ प्रवेशाची संधी अधिक होती.कारण या दोघांचाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत वर्तुळामध्ये समावेश होता तसेच मतदारसंघ विकास व विकासाचा दृष्टीकोन व महिला प्रतिनिधित्व या निकषानुसार आ. श्वेताताई महाले यांना अधिक संधी मिळेल असा आशावाद होता.परंतु मुख्यमंत्री महोदय यांनी भाऊसाहेबांच्या पुण्याईची आठवण ठेवून आ. आकाश फुंडकर यांना मंत्रिपद दिले असेच प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
नमनालाच अपशकून नको हे खरेच पण आकाश फुंडकर यांच्या नावावर “हिंदुत्व” ही एकच जमापुंजी दिसून येत असून त्यांच्या आमदार कार्यकाळात त्यांनी आ. संजय गायकवाड किंवा आ. श्वेताताई महाले यांच्यासारखी मूलभूत विकासकामे काय केलीत? हा संशोधणाचा विषय आहे.
तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यात नेमके काय हेरले? हे लवकरच कळेल आता महाराष्ट्राचे मंत्रिमहोदय म्हणून आ. आकाश फुंडकर यांनी आपली छाप सोडावी या शुभेच्छा!



