बिना नंबरप्लेट ची वाहने करतात भरधाव वेगाने रेतीची वाहतूक…..!
सामान्यांच्या जीवाला धोका! आर. टी. ओ. झोपेत की मॅनेज?
बुलढाणा जिल्ह्यातील आरटीओ कार्यालय हे झोपेत आहे की त्यांना सर्वसामान्य जीवाची काहीच काळजी नाही.प्रचंड मेहनत घेऊन आरटीओ सारख्या कार्यालयात अधिकारी होणारे व आई-वडिलांचा अभिमान असणारे हे अधिकारी नोकरी लागल्यांनतर काम करणे बंद का करत असावीत?असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात निर्माण होत असावा.
याला कारण म्हणजे चिखली शहर व शहराच्या आसपासच्या पेठ,धोत्रा भनगोजी, शेलसूर आणी धोडप सारख्या गावामध्ये सकाळी सकाळी भरधाव वेगाने रेतीची वाहतूक करणारे टिप्पर यांनी सर्वसामान्य लोकांच्या हृदयात थरकाप निर्माण केला आहे.अगदी सकाळी भरधाव वेगाने रेतीची वाहतूक (अवैधच असावी) करणारे टिप्पर एवढ्या घाईत असतात की रस्त्याने फिरायला जाणाऱ्या लोकांच्या जीवाची त्यांना काही पर्वा नसतेच.या सगळ्याच्या रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परमध्ये एक सर्वसामान्य एक सर्वसामान्य बाब नेहमी आढळून येत आहे ती म्हणजे यापैकी कोणत्याच टिप्परला कधीच नंबर प्लेट आढळून येत नाही.म्हणजे सर्वसामन्यांना जीवाने मारून पळून जाण्याचा छुपा परवानाच या टिप्परांना आर.टी.ओ. कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे असे म्हणता येईल.
या रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना नंबर प्लेट नसण्याचे कारण अगदी स्पष्ट असतानाही बुलढाण्याचा आरटीओ विभाग मात्र अजूनही एक सवारी जास्त नेणाऱ्या गरीब ऑटो किंवा मिनिडोर वाल्याना परेशान करण्यात धन्यता मानत आहे.सरकारी अधिकाऱ्यांबाबत तशीही जनतेमध्ये अतिशय नकारात्मक भावना आहे.तशात या अवैध रीती तस्करांमुळे आणि त्यांच्या वाहनांमुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव जात असतानाही आरटीओ कार्यालय व पोलीस प्रशासन ढिम्म बसून असेल तर या गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकाऱ्यांना “मुख्यमंत्री कार्यालयातील” हेडमास्तरच आता त्यांचे कर्तव्य आठवून देतील असा विश्वासही सामान्य जनतेला आहे.
एका नागरिकाचे मनोगत
गव्हर्मेंटचे अनेक योजनांमध्ये पैसे खर्च होतात परंतु अत्यावश्यक असलेल्या बाबीकडे दुर्लक्ष होते वर्षभरात अनेक ठिकाणी दारुडे असलेल्या वाहनचालकामुळे सर्वसामान्यांचे अपघात होतात अशा परिस्थितीत प्रत्येक चेक पोस्टवर वाहन चालकाची चेक अप होणे गरजेचे आहे यासाठी शासनाचा थोडा पैसा खर्च झाला अथवा कामाचा व्याप वाढला तरी चालेल परंतु अनेक लोकांचे प्राण वाचतील… श्री अजय साहेबराव रिंढे



