कर्माची फळे?
राहुल बोन्द्रे यांचे दिवस खराब की नियत खराब ? न्यायालय देणार फैसला ?
अनुराधा साखर कारखानाकडील थकीत कर्ज प्रकरण ; ५ डिसेंबरला सुनावणी !
चिखली : शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बॅंक असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकेचे काेट्यवधीचे कर्ज थकविल्या प्रकरणी नुकत्याच झालेल्या चिखली विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार राहुल बोन्द्रे यांना या मुद्द्यावर नेहमी कोंडीत पकडून सत्ताधारी पक्षाने माजी असलेल्या माजी आमदार राहुल बोन्द्रे यांना पुन्हा “माजी” आमदार बनवले.
शेतकऱ्यांची जिल्हा सहकारी बँक हे आपले कुरण समजून जिल्हा बँक खाणाऱ्या नेत्यांना माजी आ. राहुल बोन्द्रे यांच्याविरोधात सुरु झालेल्या न्यायालयीन कार्यवाहीने एक धडा मिळणार अशीच चिन्हे दिसत असून येत्या 5 डिसेंबर रोजी यासंबंधी न्यायालयीन सुनावणी दरम्यान काय निर्णय होतो ? हे जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे.
मागील बऱ्याच दशकापासून राजकीय व सहकार क्षेत्रात दिग्गज बनून लाभ घेतलेल्या माजी आ. राहुल बोन्द्रे व त्यांच्यासारख्या काँग्रेसी संस्कृतीत वाढलेल्या राजकीय व्यक्तींवर सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचारासाठी शिक्षा वा वसुली झाल्याची उदाहरणे सहसा आढळत नाहीत परंतु बुलढाणा जिल्ह्यातील राहुल बोन्द्रे यांच्या संस्थेने या बाबत केलेल्या बाबी वेशीवर टांगून राहुल बोन्द्रे यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यास बुलढाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालय व कार्यक्षम सत्ताधारी यांनी कुठलेही दडपण बाळगले नाही.
माजी आ. राहुल बोन्द्रे नुकतेच दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुक देखील पराभूत झाले असुन त्यांना या कर्जाच्या मुद्द्यावर सातत्याने काेंडीत पकडलेल्या आ. श्वेताताई महाले यांच्याकडून निवडणुकीतही पराभव पत्करलेल्या माजी आमदार राहुल बाेंद्रेंच्या अडचणीत वाढ हाेताना दिसत आहे. अनुराधा साखर कारखानाचे अध्यक्ष असताना जिल्हा बॅंकेकडून घेतलेले काेट्यवधीचे कर्ज थकविल्याप्रकरणात बॅंकेने सक्तीची वसुली चालविल्याने प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले हाेते. दरम्यान दिर्घ लढ्यानंतर बॅंकेला या प्रकरणी दिलासा मिळण्याची व राहुल बाेंद्रेंच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत असून या प्रकरणाची येत्या ५ डिसेंबर राेजी अंतिम सुनवाई हाेणार आहे.




