25.9 C
New York
Sunday, August 16, 2026

Buy now

spot_img
spot_img

जेथे जाती श्वेताताई, तेथे जमती आई – माई…… जन आशीर्वाद दौऱ्यात लाडक्या बहिणीकडून श्वेताताईंना भरभरून पाठिंबा 

चिखली : शेतकऱ्याची लेक, हक्काची बहीण, विकासकन्या अशी कितीतरी विशेषनं जनतेने त्यांना दिलीत; कारण सर्वसामान्य माणसाशी त्यांनी आपली नाळ पहिल्यापासूनच घट्ट जोडली, आपले ऋणानुबंध कायमस्वरूपी जुळवले. चिखली मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर करणाऱ्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले या महायुतीच्या उमेदवार म्हणून सलग दुसऱ्यांदा मतदारांचा कौल आजमावत आहेत. निवडणूक प्रचारासाठी त्यांनी काढलेल्या जन आशीर्वाद दौऱ्यात ग्रामीण भागात गावोगाव श्वेताताई पिंजून काढत असून प्रत्येक ठिकाणी यांचे जल्लोषात स्वागत होताना दिसते. विशेषतः लाडक्या बहिणींचा या स्वागतामध्ये केवळ पुढाकारच नसून आपुलकीचा ओलावा देखील ठायीठायी आढळून येतो.

जिल्हा परिषद सदस्य पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या श्वेताताई महाले यांनी २०१९ मध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवार म्हणून चिखली मतदारसंघातून पहिल्यांदाच विजय संपादन केला आणि आपल्या पहिल्याच कार्यकाळात विकासकामांचा उच्चांक गाठत मतदारसंघातील शहर व ग्रामीण परिसरात प्रगतीचे एक नवे पर्व सुरू केले. या निवडणुकीत देखील महायुतीच्या उमेदवार म्हणून जनतेसमोर पुन्हा एकदा आपल्या मतदान रुपी आशीर्वाद मागण्यासाठी आ. श्वेताताई महाले जात असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची श्वेताताईंनाच पसंती मिळेल याची खात्री पटते.

Related Articles

ताज्या बातम्या