सिंचन विहिरीसाठी दिव्याग व अनुसुचित जातीतील लाभार्थी यांना डावलल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार..
चिखली — पंचायत समितीचे पैसे घेवून विहीर मंजुर केल्याचे प्रकरण उघड झाल्यामुळे अनेक शेतकरी आता जागृत होत आहे.तर नियमात बसत असतांना निवड होणे आवशक असतांना महिण्यांचा कालावधी उलटलल्या नंतर अपंग व अनूसुचित जातीतील शेतकऱ्यांना सिंचन विहीर मिळणेपासुन वंचीत ठेवल्याचा प्रकार उघड झाला आहे.तर नियमांची पायमल्ली सिंचन विहीरीमधे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून टाकरखेड येथील अपंग असलेले नामदेव तोरमल व अवचितराव खरात यांनी या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प बुलढाणा व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली असुन या प्रकरणी चौकशी करुण न्याय देण्याची मागणी दि३०/०९/२०२४रोजी केली आहे

मौजे टाकरखेड येथील डोळ्याने अपंग असलेले नामदेव रामभाऊ तोरमल त्याचप्रमाणे अनुसुचित जातीमधून अवचितराव खरात यांनी २०/११/२०२३रोजी online व ofline अर्ज केला होता.याबाबत संपूर्ण परीपुर्ण ठराव व कागदपत्रे देण्याची जबाबदारी ग्रामसेवक यांची असल्याने त्यांनी ति पार देखील पाडली तर कसलीही त्रृटी नसलेले गावातील संपूर्ण प्रस्ताव पंचायत समिती यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.तर जेव्हा तालुक्यातील प्रस्तावांची पडताळणी झाली तेव्हा आपल्याला विहरीतून कुणीच वगळू शकत नाही कारण आपण अपंग असल्याने आणि दुसरा अर्ज अनुसूचित जातीत असल्याने शासनाच्या नियमात बसता असे देखील सांगितले गेले होते.आणि पडताळणी झाल्यानंतर प्रस्ताव परीपुर्ण असुन मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे संबंधित विभागाकडुन सांगीतले गेले होते.परंतु पडताळणी नंतर दोन ते तिन महिण्यांचा कालावधी उलटल्या नंतर टाकरखेड येथील 6 लाभार्थी यांचे शासन निर्णयानुसार ग्रामसभा ठरावात लाभार्थी यांचा प्राधान्यक्रम दिलेला नाही व प्रतिक्षा यादी बनवलेली नाही,आठ अ प्रमाणे सात बारा जोडलेला नाही.कुंटूबतील पती पत्नी दोघांचे सात बारा जोडलेला नाही,चेकलीस्ट नुसार अनुक्रमे कागदपत्रे लावण्यात आलेली नाही असे न पटणारी त्रृटी चे कारणे 15/07/2024 गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रामधून समोर आले आहे.
वास्तविक पाहता अपंग असलेले क्र9व अनुसूचित जातीतील लाभार्थी क्र 3यांचीच निवड होणे आवशक असतांना फक्त मागीतलेल्या पैसांची पुर्तता झाली नसल्यानेच प्रस्ताव नामंजूर झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी तक्रारीमधे केला आहे.तर 40हजार रु देऊ शकलो नाही म्हणूनच वंचीत राहल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.परंतु सर्व शासन नियमात बसत असतांना डावलण्यात आल्याने त्याचप्रमाणे आता कारवाई होण्याच्या भितीने फाईलमधील कागदपत्रे गहाळ करुण प्रस्ताव त्रृटीत काढले असल्याने या संपूर्ण प्रकरणाची व चिखली तालुक्यातील भ्रष्टाचार व अनियमीतता त्याचप्रमाणे तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी व संबंधित कर्मचारी यांनी केलेल्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी पुत्र गजानन तोरमल व अवचितराव खरात यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे
__________________________
जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांना उद्दट वागणूक…

या प्रकरणी अपंग असलेले शेतकरी अनेक दिवसांपासून या प्रकरणी पाठपुरावा करीत आहे.परंतू यामधे वरीष्ठ अधिकारीच सहभागी असल्याने कारवाई होत नसल्याने अपंग व्यक्ती च्या मुलासह टाकरखेड येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी गेले परंतु जिल्हाधिकारी यांनी शेतकरी काय म्हणतात हे काही न ऐकून घेता..उठसुट विषय घेवून येता मिच दिसतो का?अशा भाषेत बोलनं सुरू केले.विनायक सरनाईक यांनी संपूर्ण प्रकरण शासन आदेशात अपंग,अनुसूजीत जातीतील लाभार्थी यांन प्राधान्य असल्याचे समजून सांगीतले परंतु अतिशय उध्दट पणे जिल्हाधिकारी बोलत होते.जिथुन शेतकऱ्यांना न्यायाची अपेक्षा होती तोच खुर्चीवर बसलेला व्यक्त बोलतांना पदाची गरीमा राखत नसेल निवेदन भिरकावत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न उपस्थित होत आहे.यापुर्वी सुद्धा यांनी शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने यांच्या तक्रारी वरीष्ठांकडे दाखल आहेत.शेतकऱ्यांचा आपमान करणा-या जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी कार्यालयातील सि सि टी व्ही फुटेज चेक करावेत अन्यथा या प्रकरणी अपंग शेतकऱ्यांस न्याय न मिळाल्यास व प्रलंबित विहीर प्रस्तावांना मान्यता न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे.
_________________________
पडताळणी झाल्यानंतर महिणे उलटल्यानंतर प्रकरण सात बारा नसल्याचे कारण देत काढले त्रृटीत…
लाभार्थी यांचे परीपुर्ण प्रस्ताव ग्रामसेवक यांनी सादर केले.पडताळणी झाली त्यामधे कुठले प्रस्ताव मंजूर झाले हे सर्वश्रुत आहे.असे असतांना परीपुर्ण प्रस्ताव असतांना जो सिंचन विसरीसाठी मुळ पुरावा आहे त्यानंतर प्रस्ताव तयार होतो तोच सात बारा नसल्याचे कारण देत प्रस्तावात त्रृटीत काढणे हे कितपत योग्य आहे.हे त्रृटीचे कारण असू शकते का?असा सवाल आता शेतकरी उपस्थित करीत आहे.




