संकटकाळी धावून येणारा माणुसकीची संस्कृती जपणारा जनतेचा उमेदवार दिपकदादा खरात..
प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणारे आणि जनसेवक ही उपाधी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर मिळवणारे श्री.दीपक खरात यांनी आपला उमेदवारी अर्ज नुकताच जाहीर केला.
त्यांच्या उमेदवारी मुळे प्रभागातील सामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील 20 वर्षांपासून सक्रिय समाजकारणात आणि राजकारणात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असून, संकटकाळी मदतीला धावून येणारा आपला माणूस म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख चिखली शहरात निर्माण केली.
उच्चशिक्षित आणि सामाजिक जाणीवांची भान असणारे दीपक खरात हे हाडाचे शेतकरी असून त्यांनी माती सोबत आणि तळागाळातील जनतेशी आपलं नातं हे अधिक घट्ट बनवून ठेवले. गावात अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक वेळा दीपक खरात यांनी जीवाची पर्वा न करता संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात दिला.
राजकारणात वावरताना कधीही हाय प्रोफाइल म्हणून ते मिरवले नाही, त्यामुळेच लहानांपासून ते वृद्धांपर्यंत दीपक खरात हा चेहरा नागरिकांना आपला वाटतो ही त्यांची खरी कमाई. आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी नागरिकांच्या मूलभूत सोयीवर अधिक भर दिला. स्वच्छता, आरोग्य, पाणी या गोष्टी प्रामुख्याने हाताळल्या. शिक्षणा वाचून कुणाचेही नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी अनेक गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिला.
श्री.दीपक खरात या सर्वंकष आणि सर्वमान्य जनतेच्या माणसाचा ग्राउंड रिपोर्ट पुढील पूर्ण दिवसात, बुलढाणा दर्पणच्या वतीने आपणांसमोर येणार. पुढील बातमीसाठी बुलढाणा दर्पण अवश्य वाचा.




