11.8 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट: भाग 5 (नारीशक्ती प्रतिनिधित्व)

*चिखली मतदारसंघ सुंदर बनविण्याची गोष्ट: भाग ७ (नारीशक्ती प्रतिनिधित्व)*

या गोष्टीला सुरुवात होते २०१९ मध्ये विधानसभा निवडणुक निकाल लागल्यानंतर आमदार श्वेता ताई महाले पाटील निवडून आल्यानंतर…

आपण बघतो सोन्याचा चमचा आणि चांदीच ताट घेऊन जन्म घेणाऱ्यांना आयुष्यात सगळ्याच गोष्टी सहज मिळतात.आणि सोप्प्या पध्दतीने भेटतात…त्यातपण ते मुल स्त्री जातीपेक्षा पुरूष असेल तर गोष्टी अजुन सहज पध्दतीने होतात… जसं कि त्या मुलाकडे वडील,आजोबा,पणजोबा यांची संपत्ती असेल…तर त्याच्यासाठी सगळं म्हणजे उद्योग, व्यवसाय,खेळ,शिक्षणसंस्था उभारणी किंवा मग…राजकारण…अगदी फार सोप्पं होऊन जाते…पण तेच सर्वसामान्य कुटुंबातील पुरुष जातीचे मुल असेल तर त्याच्यासाठी सगळ्याच गोष्टी या कठीण होऊन जातात…

आणि मग आता विचार करा त्या सर्व सामान्य कुटुंबातील स्त्री जातीच्या बाळासाठी त्याचं जगणं आणि आयुष्यात काही करणं हे किती कठीण असेल… आणि अशाच सर्व सामान्य कुटुंबातून… स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने आणि आई वडीलांच्या आशीर्वाद आणि पुण्याईने वरती आलेल्या आपल्या मतदार संघातील विद्यमान रणरागिणी आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील यांच्यासाठी एक महिला आमदार होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नसेल…

आजही आपल्या पितृसत्ताक कुटुंब पध्दतीमध्ये आणि समाजामध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेमध्ये किती महिला आमदार आहेत… हातांच्या बोटावर आपण ते मोजु शकतो… आणि त्यामध्ये आज आपल्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील आहेत…

सध्याच्या राजकारणामध्ये जिथं पुरुषांसारखे पुरूष डगमगतांना आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे ढेपांळतांना दिसत आहेत…तिथे नारीशक्तीचं प्रतिक म्हणून आपल्या रणरागिणी आमदार सौ.श्वेताताई या खंबीर पध्दतीने उभ्या आहेत…आणि बिनबुडाचे आरोप चालु असतांनाही…(विरोधकांच हे कामच असतं म्हणा…) चिखली मतदार संघाचा विकासाचा डोलारा एक आमदार म्हणून सक्षम पध्दतीने सांभाळत आहेत…तसेच एक महिला या नात्याने तो विकास सुंदर आणि नीटनेटका व्हावा यासाठीपण प्रयत्नशील आहेत…जो कि आज चिखली कडे बघितल्यावर आपल्याला पटुन येतं…

तसंही मराठीत एक वाक्य किंवा म्हण आहे म्हणा कि,”बाईमाणसा-शिवाय घराला घरपण नाही…”

तर अशा आपल्या मतदार संघाचे घरपण टिकविण्यासाठी आणि नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी, येत्या २० नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हावरती उभ्या भाजपा उमेदवार रणरागिणी माननीय आमदार श्वेता ताई महाले पाटील यांना बटन क्रमांक “४” दाबुन प्रचंड मतांनी पुन्हा एकदा विजयी करा…आणि तुमच्या सेवेची एकवार पुनःच्च संधी द्या…

Related Articles

ताज्या बातम्या